शरीराचे सौंदर्य कायमच टिकवून ठेवण्यासाठी आणि दीर्घकाळ निरोगी राहण्यासाठी शरीरात कोलेजन असणे अतिशय महत्वाचे आहे. यामुळे त्वचेची लवचिकता वाढते आणि त्वचा कायमच सुंदर दिसते. पण आरोग्याची व्यवस्थित काळजी न घेतल्यामुळे शरीरात कोलेजनची कमतरता निर्माण होते. शरीरात निर्माण झालेली कोलेजनची कमतरता भरून काढण्यासाठी वेगवेगळ्या सप्लीमेंट्सचे सेवन केले जाते. पण असे न करता आहारात या पदार्थांचे सेवन केल्यास शरीरात कोलेजन झपाट्याने वाढेल आणि त्वचा कायमच सुंदर दिसेल.(फोटो सौजन्य – istock)
महागड्या सप्लीमेंट्सचे सेवन कारण्याऐवजी आहारात करा 'या' पदार्थांचे सेवन
कोलेजन वाढवण्यासाठी आहारात चिकन सूपचे सेवन करावे. चिकन सूप प्यायल्यामुळे शरीराला ऊर्जा मिळते आणि हाडांचे आरोग्य सुधारते. कोलेजन वाढवण्यासाठी कोणत्याही महागड्या गोळ्या किंवा औषधांचे सेवन करण्याऐवजी चिकन सूप प्यावे.
आहारात लिंबूवर्गीय फळांचे आणि आंबट फळांचे नियमित सेवन करावे. या फळांच्या सेवनामुळे त्वचा आणि केसांना अनेक फायदे होतात. चेहऱ्यावरील चमक वाढण्यासाठी आवळा, चेरी इत्यादी फळे खावीत.
सकाळच्या नाश्त्यात नियमित अंड्याचा पांढरा भाग खावा. यामुळे शरीर मजबूत राहण्यासोबतच हाडांचे सुद्धा आरोग्य सुधारेल. अंड्यांमध्ये भरपूर कोलेजन असते.
कोलेजन वाढवण्यासाठी नियमित पालेभाज्यांचे सेवन करावे. पालेभाज्या खाल्यामुळे शरीराला अनेक फायदे होतात आणि आरोग्य सुधारते. पालेभाज्यांच्या सेवनामुळे चेहऱ्यावर ग्लो येतो.
लहान मुलांपासून अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं चिकन खायला खूप जास्त आवडते. चिकन किंवा माशांचे आहारात नियमित सेवन केल्यास कोलेजन वाढण्यास मदत होईल.