मॅग्नेशियमची कमतरता भरून काढण्यासाठी आहारात करा 'या' पदार्थांचे सेवन
केळ्यांमध्ये मॅग्नेशियम आणि पोटॅशियमचा चांगला स्रोत आढळून येतो. मध्यम आकाराच्या केळीमध्ये सुमारे ३२ मिलीग्राम मॅग्नेशियम असते, त्यामुळे तुम्ही स्मूदी किंवा नुसतेच केळ खाऊ शकता.
तपकिरी रंगाच्या तांदळांमध्ये मॅग्नेशियम आणि फायबर अधिक प्रमाणात असते. त्यामुळे या तांदळाचा वापर करून मसाले भात किंवा खिचडी बनवून खाऊ शकता.
अंजीरमध्ये मॅग्नेशियम आणि फायबर मोठ्या प्रमाणात असते. अंजीरपासून तुम्ही स्मूदी किंवा इतर पदार्थ बनवून खाऊ शकता. याशिवाय तुम्ही सुका मेवा म्हणून अंजीर खाऊ शकता.
बदाम खाणे आरोग्यासाठी अतिशय प्रभावी आहे. सकाळी उठल्यानंतर रिकाम्या पोटी नियमित ४ ते ५ बदाम खावे. ज्यामुळे शरीरातील कमी झालेली मॅग्नेशियमची पातळी वाढण्यास मदत होईल.
दैनंदिन आहारात भोपळ्याच्या बियांचे सेवन करावे. या बियांमध्ये मॅग्नेशियम मुबलक प्रमाणात आढळून येते. ३० ग्रॅम भोपळ्याच्या बियांमध्ये सुमारे १५० मिलीग्राम मॅग्नेशियम असते, त्यामुळे ओट्स किंवा इतर पदार्थांबसोबत तुम्ही या बियांचे सेवन करू शकता.