पचनाच्या समस्येपासून कायमचा आराम मिळवण्यासाठी आहारात करा 'या' पदार्थांचे सेवन
बिघडलेली पचनक्रिया सुधारण्यासाठी कोकमच्या पाण्याचे सेवन केल्यास पोटासंबंधित समस्या दूर होतील. कोकम तुम्ही भाजी किंवा आमटीमध्ये टाकू शकता.
सकाळी उठल्यानंतर उपाशी पोटी जिऱ्याचे पाणी प्यायल्यास पचनासंबंधित कोणतीही समस्या उद्भवत नाही. याशिवाय पोट नेहमी स्वच्छ राहते.
हिंगाचा वापर केल्यामुळे जेवणाची चव वाढण्यास मदत होते. याशिवाय पचनसंस्था सुधारण्यास मदत होते. त्यामुळे नियमित जेवणात हिंग टाकावे.
जेवणात फोडणी देण्यासाठी कढीपत्त्याच्या पानांचा वापर केला जातो. कढीपत्त्याच्या पानांचा वापर केल्यामुळे पचनक्रिया सुरळीत राहते. याशिवाय पोटासंबंधित कोणत्याही समस्या उद्भवत नाहीत.
जेवणांनंतर नियमित बडीशेप खाल्यास जेवलेले अन्नपदार्थ सहज पचन होतात. याशिवाय शरीराला कोणतीही हानी पोहचत नाही. त्यामुळे जेवणानंतर नियमित बडीशेप खावी.