सांधे दुखीच्या समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी 'या' पदार्थांचे करा सेवन
रोजच्या आहारात विटामिन सी युक्त फळांचे सेवन करावे. यामध्ये तुम्ही संत्री, अननस, पपई इत्यादी फळांचे सेवन करू शकता. यामुळे आरोग्य सुधारण्यास मदत होईल.
दह्यामध्ये कॅल्शियम आणि प्रोबायोटिक्स मुबलक प्रमाणात आढळून येतात.ज्यामुळे हाडं मजबूत राहतात. पचनसंस्था निरोगी ठेवण्यासाठी नियमित दह्याचे सेवन करावे.
मॅग्नेशियम युक्त अक्रोडाचे सेवन केल्यामुळे हाडांना पोषण मिळते. शिवाय यामध्ये ओमेगो ३ फॅटी ऍसिड आढळून येते, ज्याचा शरीराला फायदा होतो. अक्रोड खाल्यामुळे शरीरात होणारी जळजळ कमी होते आणि स्नायूंना आराम मिळतो.
हिवाळ्यात बाजारामध्ये हिरव्या पालेभाज्या मुबलक प्रमाणात मिळतात. यामध्ये तुम्ही पालक, मेथी, मोहरीची भाजी इत्यादी भाज्यांचे नियमित सेवन केल्यास सांधे दुखीची समस्या कमी होईल आणि आराम मिळेल.
सांधे दुखीच्या समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी आहारात माश्यांचे सेवन करावे. तसेच आहारात प्रामुख्याने सॅल्मन, मॅकरेल आणि सार्डिन इत्यादी माशांचे सेवन करावे. कारण यामध्ये ओमेगो ३ फॅटी ऍसिड आढळून येते.