थंडीच्या दिवसांमध्ये नियमित करा 'या' शक्तिशाली भाज्यांचे सेवन
थंडीच्या दिवसांमध्ये बाजारात मोठ्या प्रमाणावर पालेभाज्या उपलब्ध असतात. त्यातील सगळ्यांच्या आवडीची भाजी म्हणजे पालक. या भाजीमध्ये लोह, कॅल्शियम, मॅग्नेशियम, पोटॅशियम आणि जीवनसत्त्वे अ, क आणि के इत्यादी अनेक घटक आढळून येतात.
सॅलड बनवताना त्यात आवर्जून गाजर टाकले जाते. गाजर खाल्ल्यामुळे केवळ डोळ्यांची दृष्टी सुधारत नाहीतर संपूर्ण शरीराला अनेक फायदे होतात. यामध्ये असलेले बीटा-कॅरोटीन त्वचा कायमच हायड्रेट ठेवते.
चवीला कडू असलेली मेथी भाजी अनेकांना खायला आवडत नाही. पण मेथीच्या भाजीमध्ये अनेक पौष्टिक गुणधर्म आढळून येतात. यामध्ये लोह, कॅल्शियम आणि फॉस्फरस इत्यादी अनेक घटक आढळून येतात.
लोहयुक्त बीटचे रोजच्या आहारात नियमित सेवन केल्यास शरीरात निर्माण झालेली रक्ताची कमतरता भरून निघेल. यामध्ये असलेले अँटीऑक्सिडंट आणि दाहक-विरोधी गुणधर्म शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढवतात.
सलगम या भाजीकडे अनेक लोक कायमच दुर्लक्ष करतात. विटामिन सी आणि अँटीऑक्सिडंट्सने समृद्ध सलगम शरीरासाठी अतिशय पौष्टीक आहे. यामध्ये भरपूर प्रमाणात फायबर आढळून येते.