फुफ्फुसांच्या आरोग्यासाठी या फळांचे करा सेवन
लाल रंगाच्या स्ट्रॉबेरीमध्ये मोठ्या प्रमाणावर विटामिन सी आढळून येतात. स्ट्रॉबेरीपासून अनेक पदार्थ बनवले जातात. तसेच फुफ्फुसांचे बिघडलेले आरोग्य सुधारण्यासाठी रोजच्या आहारात स्ट्रॉबेरीचे सेवन करावे.
फायबर, जीवनसत्त्वे आणि अँटिऑक्सिडंट्स युक्त ब्लॅकबेरी फुफ्फसांसाठी अतिशय गुणकारी आहेत. ब्लॅकबेरी किमतीने महाग आहेत, पण या फळाचे सेवन केल्यामुळे फुफ्फुसांचे हानिकारक रोगांपासून नुकसान होत नाही.
विटामिन सी युक्त संत्री खाल्यामुळे फुफ्फुसांचे आरोग्य सुधारण्यास मदत होते. संत्रींमध्ये असलेले अँटिऑक्सिडेंट फुफ्फुसांमधील जळजळ कमी करण्यासाठी मदत करतात.
लहान मुलांसह मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं अननस खायला खूप आवडते. अननस चवीला आंबट गोड असते. तसेच शरीरात साचून राहिलेली घाण स्वच्छ करण्यासाठी तुम्ही अननसाचे सेवन करू शकता.
नियमित एक सफरचंद खाण्याचा डॉक्टर सल्ला देतात, कारण सफरचंद खाल्ल्यामुळे शरीर निरोगी राहण्यास मदत होते. सफरचंदमध्ये असलेले फायबर फुफ्फुसांच्या आरोग्यासाठी गुणकारी आहे.