शरीरात साचून राहिलेले विषारी घटक आरोग्यासाठी अतिशय घातक असतात. यकृत आणि मूत्रपिंड शरीरात साचून राहिलेली घाण स्वच्छ करण्यास मदत करतात. मात्र बऱ्याचदा आहारात सतत तेलकट किंवा तिखट पदार्थांचे सेवन केल्यामुळे किंवा सतत प्रक्रिया केलेले अन्नपदार्थ खाल्यामुळे किडनीच्या कार्यात अनेक अडथळे निर्माण होतात. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला नैसर्गिकरित्या मूत्रपिंड आणि यकृत स्वच्छ करण्यासाठी रोजच्या आहारात कोणत्या फळांचे सेवन करावे, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. या फळांचे सेवन शरीरासाठी फायदेशीर ठरते.(फोटो सौजन्य – istock)
नैसर्गिकरित्या मूत्रपिंड आणि यकृत स्वच्छ करण्यासाठी रोजच्या आहारात नियमित करा 'या' फळांचे सेवन
जांभूळ खाल्यामुळे आरोग्याला अनेक फायदे होतात. जांभुळच्या बिया आणि लगदा मूत्रपिंडावरील ऑक्सिडेटिव्ह ताण कमी करण्यास मदत करतात. याशिवाय शरीरात वाढलेला मधुमेह नियंत्रणात राहण्यासाठी मदत होते.
डाळिंब खाल्यामुळे शरीरात रक्ताची पातळी सुधारते. डाळिंब खाल्यामुळे शरीरात साचून राहिलेले विषारी घटक बाहेर पडून जातात आणि शरीराला अनेक फायदे होतात.
पपई यकृताच्या आरोग्यासाठी अतिशय गुणकारी आहे. पपईमध्ये 'पपेन' नावाचे एक विशेष एंजाइम अन्नातील प्रथिने पचवण्यास मदत करतात. यामुळे यकृतावरील भार कमी होतो.
क्रॅनबेरी मूत्रमार्गाच्या संसर्गापासून शरीराचा बचाव करते. शरीरात साचून राहिलेल्या विषारी घटकांमुळे किडनीवर गंभीर परिणाम होण्याची जास्त शक्यता असते. त्यामुळे किडनीवर वाईट परिणाम होतात. अशावेळी क्रॅनबेरीमध्ये असलेले अँटी-ऑक्सिडंट्स किडनीला स्वच्छ करण्याचे काम करते.
संत्र्यामध्ये विटामिन सी आणि पोटॅशियम मोठ्या प्रमाणावर आढळून येते. संत्र खाल्यामुळे किडनी आतून स्वच्छ होते. याशिवाय शरीरात साचून राहिलेले विषारी घटक बाहेर पडून जातात.