उच्च प्रथिनांसाठी अंड्याऐवजी आहारात करा 'या' भाज्यांचे सेवन
ब्रोकोली खाणे आरोग्यासाठी अतिशय पौष्टिक आहे. यामध्ये फायबर, विटामिन सी आणि अँटीऑक्सिडंट्स, प्रथिने मोठ्या प्रमाणावर आढळून येतात. त्यामुळे आहारात तुम्ही ब्रोकोलीची भाजी किंवा ब्रोकोली सूप पिऊ शकता.
प्रथिनांची कमतरता भरून काढण्यासाठी आठवड्यातून दोनदा किंवा तीनदा सोयाबीनची भाजी बनवून खावी. सोयाबीनमध्ये भरपूर प्रमाणात प्रथिने आढळून येतात.
मशरूम केवळ चवीलाच नाहीतर आरोग्यासाठी सुद्धा अतिशय पौष्टिक आहे. यामध्ये असलेले पौष्टिक घटक आरोग्य सुधारण्यासाठी मदत करतात. मशरूममध्ये विटामिन डी आणि अँटीऑक्सिडंट्स भरपूर आढळून येते.
घरातील सर्वच मटारची भाजी मोठ्या आवडीने खातात. चवीला गोड लागणारे मटार आरोग्यासाठी अतिशय प्रभावी आणि पौष्टिक आहेत. यामध्ये फायबर आणि लोह भरपूर असते.
शाहाकारी लोकांसाठी राजमा अतिशय उत्तम आहे. कारण शरीरात निर्माण झालेली प्रथिनांची कमतरता भरून काढण्यासाठी आहारात राजमा खावा. यामुळे पचनक्रिया सुधारते.