सकाळी उठल्यानंतर पोट व्यवस्थित स्वच्छ न झाल्यास आतड्यांमध्ये विषारी घटक जमा होऊन राहतात. शरीरात साचून राहिलेल्या घाणीमुळे पोट फुगणे, गॅस, बद्धकोष्ठता, पोटात दुखणे यांसारखी अनेक लक्षणे दिसून येतात. पोट व्यवस्थित स्वच्छ न झाल्यास संपूर्ण दिवस कंटाळवाणा जातो. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला उपाशी पोटी कोणत्या पेयांचे सेवन करावे, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. हे पेय आतड्यांमधील घाण बाहेर काढून टाकतात आणि शरीर डिटॉक्स करण्यास मदत करतात. (फोटो सौजन्य – istock)
टॉयलेट सीटवर बसताच पोट होईल स्वच्छ! बद्धकोष्ठतेपासून आराम मिळवण्यासाठी नियमित करा 'या' ड्रिंकचे सेवन

रात्री झोपण्याआधी एक ग्लास पाण्यात जिरं टाकून रात्रभर भिजत ठेवावे. सकाळी उठल्यानंतर पाणी गाळून सेवन करा. यामुळे बद्धकोष्ठता आणि अपचनाच्या सर्व समस्या कायमच्या नष्ट होतील.

आपल्यातील अनेकांना जेवणानंतर बडीशेप खाण्याची सवय असते. बडीशेप खाल्ल्यामुळे अन्नपदार्थ सहज पचन होतात आणि आतड्यांचे आरोग्य सुधारते. याशिवाय बडीशेप पोटातील गॅस कमी करते.

आलं आणि ओव्याचे पाणी एकत्र करून आतड्या स्वच्छ होतात. पोटात वाढलेला जडपणा, अपचन, उलट्या, मळमळ आणि पचनाच्या सर्वच समस्यांपासून सुटका मिळवण्यासाठी आलं ओव्याचे पाणी प्यावे.

दुपारच्या जेवणानंतर नियमित एक ग्लास ताक प्यावे. ताक प्यायल्यामुळे पचनक्रिया सुधारण्यास मदत होते आणि शरीराला सुद्धा असंख्य फायदे होतात.

सकाळी उठल्यानंतर उपाशी पोटी कोमट पाण्यात लिंबाचा रस मिक्स करून प्यायल्यास शरीरातील घाण बाहेर पडून जाईल. लिंबाच्या रसात असलेले घटक शरीर स्वच्छ करतात.






