वाढत्या थंडी शरीरात उष्णता टिकवून ठेवण्यासाठी आहारात करा 'या' सूपचे सेवन
आंबटगोड चवीचे टोमॅटो सूप सगळ्यांचं खूप जास्त आवडते. टोमॅटो सूप बनवण्यासाठी फार कमी साहित्य लागते. यामध्ये विटामिन सी, अँटिऑक्सिडंट्स आणि लाइकोपीन इत्यादी अनेक घटक आढळून येतात. यामुळे शरीराची रोगप्रतिकारशक्ती सुधारते.
वेगवेगळ्या भाज्यांचा वापर करून बनवलेले सूप चवीला अतिशय सुंदर लागते. गाजर, बीट, शेंगा, कोबी आणि टोमॅटो इत्यादी पौष्टिक भाज्यांचा वापर करून सूप बनवले जाते. सूप प्यायल्यामुळे सर्दी खोकला कमी होतो.
थंडीच्या दिवसांमध्ये आरोग्यासाठी लसूण अतिशय प्रभावी मानला जातो. लसूण खाल्ल्यामुळे शरीराला अनेक फायदे होतात. लसूणमध्ये अँटी बॅक्टेरियल गुणधर्म मोठ्या प्रमाणावर आढळून येतात.
मक्याचे दाणे, गाजर आणि इतर भाज्यांचा वापर करून बनवलेले झणझणीत सूप सर्दी खोकल्यापासून सुटका मिळवून देईल. सकाळच्या नाश्त्यात किंवा संध्याकाळच्या वेळी सूप प्यायल्यास शरीराला आराम मिळेल.
पालकमध्ये लोह, कॅल्शियम आणि जीवनसत्त्व के इत्यादी अनेक घटक आढळून येतात. यामुळे त्वचा चमकदार राहते. हाडे मजबूत ठेवण्यासाठी पालक सूप किंवा पालक स्मूदी प्यावी.