उन्हाळ्यात जास्त प्रमाणात मांसाहारी पदार्थांचे सेवन केल्यास शरीरसंबंधित उद्भवतील 'या' गंभीर समस्या
उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये मांसाहारी पदार्थांचे अतिसेवन केल्यामुळे पचनसंस्था बिघडण्याची शक्यता असते. पचनसंस्था बिघडल्यानंतर गॅस, अपचन, बद्धकोष्ठता इत्यादी अनेक समस्या उद्भवू लागतात.
मांसाहारी पदार्थ अतिशय उष्ण असतात. या पदार्थांचे सेवन केल्यामुळे शरीरात उष्णता निर्माण होण्याची शक्यता असते. शरीराचे तापमान वाढल्यानंतर डिहायड्रेशन किंवा उष्माघातासारख्या समस्या वाढू लागतात.
उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये चिकन, मटण वर बॅक्टरीया वाढण्याची शक्यता असते.अशा पदार्थांचे सेवन केल्यामुळे अन्नपदार्थांवरील बॅक्टरीया शरीरात जातात आणि अन्नातून विषबाधा होते.
दैनंदिन आहारात जास्त प्रमाणात चिकन, मटण किंवा मांसाहारी पदार्थांचे सेवन केल्यामुळे शरीरात हानिकारक पदार्थ तयार होतात. यामुळे काहीवेळा त्वचेचे इन्फेक्शन होण्याची शक्यता असते.
मांसाहारी अन्नपदार्थ पचण्यासाठी जास्त वेळ लागतो. त्यामुळे उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये कमीत कमी मांसाहारी पदार्थ खावेत.