'या' फुलांचे सेवन केल्यास त्वचेच्या सौंदर्यासोबतच आरोग्य राहील कायमच निरोगी, पूर्वीच्या काळातील पारंपरिक उपाय
गोकर्णाच्या फुलांपासून बनवलेला चहा नियमित प्यायल्यास चेहऱ्यावर चमकदार ग्लो येईल आणि त्वचा सुंदर दिसेल. यामध्ये अँटी ऑक्सिडंट्स मुबलक प्रमाणात आढळून येतात.
गुलाबाच्या पाकळ्यांपासून बनवलेला गुलकंद केवळ चवीसाठी नाहीतर शरीरासाठी सुद्धा खूप जास्त फायदेशीर आहे. गुलाबाच्या पाकळ्यांचा फेसपॅक त्वचेला नैसर्गिक चमक देतो.
झेंडूच्या फुलामध्ये दाहशामक आणि अँटीबॅक्टेरियल गुणधर्म असतात. त्यामुळे छोट्या मोठ्या जखमा किंवा त्वचेमध्ये वाढलेली जळजळ कमी करण्यासाठी झेंडूच्या फुलांचा वापर करावा.
जास्वदींच्या फुलांचा वापर केवळ गणपती बाप्पासाठी नाहीतर चहा बनवण्यासाठी सुद्धा केला जातो. फुले पाण्यात शिजवून त्यातील रस काढून चहा तयार करू शकता. यामध्ये असलेले अँटी ऑक्सिडंट्स आणि पोषक घटक केसांची वाढ करण्यास मदत करतात.
चमेलीचे फूल केस आणि त्वचेसाठी फायदेशीर मानली जातात. या फुलांमध्ये असलेले गुणकारी घटक केस मऊ आणि मजबूत करण्यास मदत करतात.