जास्त प्रमाणात मधाचे सेवन केल्यास आरोग्याचे होईल नुकसान
मधामध्ये आढळून येणारा नैसर्गिक गोडवा मधुमेह असणाऱ्या रुग्णांसाठी अतिशय घातक आहे. यामुळे रक्तातील साखरेची पातळी वाढण्याची शक्यता असते. तसेच शरीरातील इन्सुलिनचे संतुलन बिघडून जाते. त्यामुळे जास्त मध खाऊ नये.
मधामध्ये आढळून येणारे फ्रुक्टोजचे जास्त सेवन केल्यामुळे फॅटी लिव्हरचा आजार होऊ शकतो. फॅटी लिव्हरची समस्या उद्भवू लागल्यानंतर लिव्हरमध्ये अतिरिक्त चरबी वाढू लागते.
नियमित मधाचे सेवन केल्यामुळे पोटात जळजळ, आम्लता आणि अतिसार इत्यादी समस्या निर्माण होऊ शकतात. यामुळे शरीराची पचनक्रिया मंदावते आणि आरोग्याला हानी पोहचते.
अतिप्रमाणात मध खाल्यामुळे लठ्ठपणा वाढू शकतो. कारण यामध्ये साखरेचे गोडवा जास्त असतो. मधामध्ये कॅलरीज आणि साखरेचे प्रमाण जास्त असते, ज्यामुळे शरीरात चरबी जमा होऊ शकते.
उच्च रक्तदाबाची समस्या असलेल्या लोकांसाठी मध खाणे अतिशय फायदेशीर आहे. पण अतिप्रमाणात मध खाल्यामुळे हायपोटेन्शन, चक्कर येणे, अशक्तपणा आणि थकवा येऊ शकतो.