Dhanteras Gold Investment Offer : धनत्रयोदशी आणि दिवाळीच्या पवित्र मुहूर्तावर सोन्यात गुंतवणूक करू इच्छिणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. सोन्याच्या किमती जानेवारीतील उच्चांकावरून खाली आल्यामुळे १ लाख रुपयांच्या गुंतवणुकीवर आता पूर्वीपेक्षा अधिक सोने मिळण्याची संधी निर्माण झाली आहे. ( सौजन्य - Pinterest )
सोनं खरेदी करणाऱ्यांसाठी खूशखबर! ( सौजन्य - Pinterest )

जानेवारी २०२६ मधील उच्चांकी पातळीच्या तुलनेत सध्या सोन्याचे भाव सुमारे २० ते २३ टक्क्यांनी घसरले आहेत, ज्यामुळे ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

जानेवारीत १ लाख रुपयात ५.७ ग्रॅम मिळणारे सोने आता त्याच रकमेत तब्बल ७.१ ग्रॅमपर्यंत खरेदी करता येत आहे.

गेल्या वर्षीच्या धनत्रयोदशीच्या तुलनेत सध्या सोन्याचे भाव सुमारे ८% अधिक असले, तरी जानेवारीच्या उच्चांकावरून खरेदीदारांसाठी ही उत्तम संधी आहे.

बाजारातील अस्थिरता पाहता तज्ज्ञांच्या मते गुंतवणूक एकाच वेळी न करता ती टप्प्याटप्प्याने SIP द्वारे करणं सोयीचं ठरेल.

रक्कम ४ ते ५ महिन्यांच्या एसआयपीमध्ये विभागल्यास, भाव आणखी घसरल्यास दर महिन्याला जास्त ग्रॅम सोने मिळण्याचा फायदा होतो.






