PHOTO GENRATE AI
Bengaluru News : बंगळूरुमध्ये रस्ते सुरक्षेला आव्हान देणारी एक चिंताजनक व्हिडिओ समोर आला आहे. देशाची सिलिकॉन व्हॅली म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बंगळूरुसहरात नॅशनल कॉलेजवळ उच्चभ्रू आणि गजबजलेल्या जयनगर परिसरा मध्ये काही तरुणांनी सोशल मीडियावर लाईक्स आणि व्ह्यूज मिळवण्याच्या नादात स्वतःचा आणि लोकांचा जीव देखील धोक्यात घालण्याचा प्रयत्न केला आहे.
भर दिवसाढवळ्या त्यांनी एका वर्दळीच्या रस्त्यावर आपल्या बाईकचे पुढचे चाक हवेत उचलून धोकादायक व्हीलीचा स्टंट पाहण्यास मिळतो आहे. या घटनेचा व्हिडिओ चित्रित करून तो इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर तसेच इतर सोशल मिडिया साईडवर व्हायरल होत आहे.
हा स्टंट करताना, इतर वाहने आणि पादचारीमार्गातीन नागरिक जात होते. या ठिकाणी एक छोटीशी चुक जरी झाली असती तर मोठा अपघात होण्याची शक्यता होती. या व्हिडिओमुळे आता स्थानिक रहिवाशांमध्ये तीव्र संताप निर्माण होत आहे. तसेच बंगळूरु वाहतूक पोलिसांकडे या बेपर्वा स्टंटमनवर शक्य तितकी कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. या तरुणाने चालत्या दुचाकीवर धोकादायक ‘व्हीली’ स्टंट केल्यामुळे रस्ते सुरक्षेबाबत गंभीर चिंता निर्माण केली जात आहे.
🚨🏍️*National College in Jayanagar, Bengaluru*:- The video shows a young rider holding a prolonged wheelie on a two-wheeler along a public road near National College in Jayanagar, Bengaluru, in daytime traffic under a flyover. Filmed from another vehicle, it has gone viral and drawn attention to road safety risks. Jayanagar traffic police are expected to review it.
#NationalCollege #Jayanagar #bengaluru — Priyanka Kanade (@1Hindu_Sanatani) October 31, 2026
हा तरुण इतर वाहनचालक आणि पादचाऱ्यांच्या सुरक्षेची पर्वा न करता दुचाकी केवळ मागच्या चाकावर चालवताना दिसला. हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर अपलोड करण्यात आला होता, ज्याचा उद्देश कदाचित ‘लाईक्स’ आणि ‘व्ह्यूज’ मिळवणे असा अंदाज असावा.अशा प्रकारची बेजबाबदार कृत्य पूर्वी सहसा रात्रीच्या वेळी घडताना दिसत होती. पण हे आताचे ताजे उदाहरण आहे. की काही वाहनचालक भरदिवसाही असे स्टंट करत असतात. यांना वेळीच निर्बंध घालणे गरजेचे आहे. तसेच ही घटना जयनगर ट्रॅफिक पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडल्याचे समजते जाते.
या घटनेमुळे चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून, अशा धोकादायक पद्धतीने वाहन चालवणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्याची मागणी होत असून या व्हायरल व्हिडिओच्या संदर्भात पोलिसांकडून काय कारवाई केली जाईल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Ans: बंगळूरुमधील जयनगर परिसरात नॅशनल कॉलेजजवळ
Ans: दुचाकीचे पुढील चाक हवेत उचलून केवळ मागील चाकावर बाइक चालवताना दिसत आहे.
Ans: सोशल मीडियावर लाईक्स आणि व्ह्यूज मिळवण्यासाठी हा स्टंट केला






