
वजन कमी करायचे आहे? मग सकाळच्या नाश्त्यात करा पौष्टिक हाय प्रोटीन सँडविच, नोट करा रेसिपी
Breakfast Recipe: वजन वाढेल या भीतीने अनेक लोक सकाळचा नाश्ता करणे टाळतात. शरीरावर वाढलेली अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी आहारात बदल, महागडे सप्लिमेंट्स, तासनतास व्यायाम, गोळ्या औषधांचे सेवन इत्यादी अनेक गोष्टी केल्या जातात. पण चुकीच्या पद्धतीने वजन कमी करण्याचा प्रयत्न केल्यास शरीरावर त्याचे थेट परिणाम दिसू लागतात. त्यामुळे आहारात सहज पचन होणाऱ्या पदार्थांचे सेवन करणे आवश्यक आहे. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला हाय प्रोटीन सँडविच बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. हा पदार्थ केवळ वजन कमी करणारेच नाहीतर लहान मुले, घरातील इतर व्यक्तीसुद्धा खाऊ शकतात. हाय प्रोटीन सॅलड बनवताना वेगवेगळ्या भाज्यांचा वापर केला जातो. भाज्यांचे सेवन केल्यामुळे शरीराला भरमसाट फायदे होतात आणि आरोग्य सुधारते. बाजारात मिळणारे मेयोनीज, टोमॅटो केचअप किंवा भरपूर प्रमाणात चीज असलेले क्रीम किंवा सँडविच स्प्रेड आणून खाण्यापेक्षा घरी बनवलेले पनीर स्प्रेड शरीरासाठी गुणकारी ठरते. चला तर जाणून घेऊया हाय प्रोटीन सँडविच बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – istock)