
Aamla Muramba Recipe: पारंपरिक पद्धतीने बनवा वर्षभर टिकून राहणारा आवळ्याचा मुरंबा, नियमित खाल्ल्यास शरीराला होतील फायदे
Aamla Muramba Recipe: वर्षाच्या बाराही महिने बाजारात मोठ्या प्रमाणावर आवळे उपलब्ध असतात. आवळे खाल्ल्यामुळे शरीराला भरमसाट फायदे होतात. यामध्ये विटामिन सी, लोह, ॲण्टीऑक्सिडंट्स इत्यादी अनेक घटक आढळून येतात. आवळ्यामध्ये असलेल्या विटामिन सी मुळे शरीराची कमकुवत झालेली रोगप्रतिकारशक्ती सुधारण्यास मदत होते. त्यामुळे डॉक्टरसुद्धा नियमित एक आवळा खाण्याचा सल्ला देतात. पण आवळ्याची चव कच्च्या आवळ्याची चव तुरट लागल्यामुळे आवळा खाण्यास नकार दिला जातो. त्यामुळे कच्चा आवळा खाण्याऐवजी अस्सल पारंपरिक पद्धतीने आवळ्याचा मुरंबा बनवावा. यामुळे शरीराला सुद्धा फायदे होतात आणि आरोग्य सुधारण्यास मदत होते. गॅसेस, अपचन, ॲसिडीटी आणि पचनाच्या इतर त्रासांपासून सुटका मिळवण्यासाठी आवळ्याचे सेवन करावे. चला तर जाणून घेऊया आवळ्याचा मुरंबा बनवण्याची रेसिपी.(फोटो सौजन्य – istock)