रात्रीच्या वेळी चुकूनही करू नका 'या' पदार्थांचे सेवन
रात्री अल्कोहोलचे सेवन केल्यामुळे शरीरात जळजळ वाढते. यामुळे पचनसंस्थेला हानी पोहचतो. छातीत जळजळ आणि आम्लता होऊ नये म्हणून अल्कोहोल पिणे टाळावे.
चहा, कॉफीचे सेवन केल्यामुळे पोटात जळजळ आणि छातीमध्ये जळजळ वाढू लागते. रात्रीच्या वेळी कॉफी, चहा आणि एनर्जी ड्रिंक्स सारखी कॅफिनयुक्त पेयांचे सेवन करणे टाळावे.
रात्री झोपण्याआधी तळलेले पदार्थ खाऊ नये. कारण हे पदार्थ पचनासाठी अतिशय जड असतात. या पदार्थांच्या सेवनामुळे पचनावर वाईट परिणाम होतात.
रात्रीच्या वेळी दूध, चीज आणि दही यांसारखे अनेक दिवस साठवून ठेवलेले दुग्धजन्य पदार्थ चुकूनही खाऊ नये. या पदार्थांच्या सेवनामुळे शरीरात जळजळ वाढते.
रात्रीच्या जेवणात खूप जास्त मसालेदार आणि तिखट पदार्थांचे सेवन केल्यास पचनक्रिया बिघडू शकते. याशिवाय रात्रभर छातीमध्ये जळजळ होऊ शकते. मसालेदार अन्नामुळे पोटात जळजळ आणि आम्लपित्त वाढते.