दह्यासोबत चुकूनही करू नका 'या' पदार्थांचे सेवन
दही केळ किंवा दूध आणि केळ खाणे आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आहे. पण दह्यासोबत केळ खाणे आरोग्यासाठी चांगले नाही. यामुळे छातीमध्ये जडपणा जाणवणे किंवा छातीमध्ये जळजळ वाढू लागते.
दह्यासोबत लिंबू, लिंबूवर्गीय फळे किंवा आंब्यापासून बनवलेल्या पदार्थांचे सेवन केल्यास शरीराला हानी पोहचण्याची शक्यता असते. यामुळे उलट्या, जुलाब किंवा पोटासंबंधित सर्व समस्या उद्भवू शकतात.
दही आणि कांदा एकत्र खाल्यामुळे पचनक्रिया बिघडण्याची शक्यता असते. कारण कांदा अतिशय उष्ण आहे, तर दही थंड पदार्थ असल्यामुळे पचनासंबंधित समस्या उद्भवू शकतात.
दही खाल्यानंतर त्यावर माशांचे सेवन करू नये. कारण या दोन्ही पदार्थांमध्ये प्रथिने आढळून येतात, जे आरोग्यासाठी फायदेशीर आहेत. पण मासे आणि दही एकत्र खाल्यामुळे अपचनाची समस्या उद्भवून पोटात दुखणे,उलट्या, मळमळ इत्यादी समस्या उद्भवू शकतात.
गरम अन्नपदार्थांसोबत कधीही दह्याचे सेवन करू नये. यामुळे गॅस आणि अपचनाची समस्या वाढू लागते. शरीरात वाढलेली अपचनाची समस्या आरोग्यासाठी काहीवेळा घातक ठरते.