उपाशी पोटी नियमित करा 'या' पेयांचे सेवन, यकृतापासून फुफ्फुसांपर्यंत सर्वच अवयव होतील स्वच्छ
कोमट पाण्यात लिंबाचा रस आणि हळद मिक्स करून उपाशी पोटी सेवन करावे. या पेयाच्या सेवनामुळे शरीरात साचून राहिलेले विषारी घटक बाहेर पडून जातात. याशिवाय शरीरात वाढलेली जळजळ कमी करण्यासाठी हळदीचे पाणी प्रभावी ठरते.
आल्यामध्ये असलेले दाहक विरोधी गुणधर्म शरीरातील घाण स्वच्छ करतात. त्यामुळे सकाळी उठल्यानंतर दुधाचा चहा किंवा इतर कोणत्याही पेयांचे सेवन करण्याऐवजी आल्याचा चहा किंवा पाणी तयार करून प्यावे.
बीट आणि गाजर आरोग्यासाठी वरदान आहेत. शरीर स्वच्छ करण्यापासून ते अगदी शरीरातील थकवा दूर करण्यासाठी मदत करतात. नियमित उपाशी पोटी एक ग्लास बीट आणि गाजरच्या रसाचे सेवन केल्यास शरीर स्वच्छ होईल.
यकृतामध्ये जमा झालेली अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी मेथी दाण्यांचे पाणी प्यावे. या पाण्याच्या सेवनामुळे रक्तात वाढलेली साखर नियंत्रणात राहते आणि कोलेस्ट्रॉलची धोका कमी होतो.
औषधी गुणधर्मांनी समृद्ध असलेले जेष्ठमध शरीरासाठी अतिशय प्रभावी ठरते. फुफ्फुसांमध्ये साचून राहिलेली घाण स्वच्छ करण्यासाठी जेष्ठमधाचे पाणी प्यावे.