उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये महिनाभर करू नका चहाचे सेवन
उन्हाळ्यात सतत चहा कॉफीचे सेवन केल्यामुळे शरीरातील पाण्याची पातळी कमी होऊन जाते. त्यामुळे उन्हाळा वाढल्यानंतर चहाचे सेवन न करता थंडपदार्थांचे सेवन करावे. यामुळे शरीराला अनेक फायदे होतील.
चहाचे सेवन केल्यामुळे शरीरात उष्णता वाढत जाते. त्यामुळे उन्हाळ्यासह इतर कोणत्याच ऋतूंमध्ये अतिप्रमाणात चहा पिणे टाळावे. चहाचे सेवन कमी केल्यामुळे शरीराची पचनसंस्था निरोगी राहते.
उन्हाळ्यात शरीर हायड्रेट ठेवण्यासाठी कॅफिन युक्त पेयांचे सेवन करण्याऐवजी लिंबूपाणी, ताक किंवा नारळ पाणी इत्यादी शरीरासाठी आवश्यक असलेल्या पेयांचे सेवन करावे.
चहा प्यायल्यामुळे मज्जासंस्था सक्रिय होते, ज्यामुळे बऱ्याचदा झोपेची गुणवत्ता खराब होण्याची जास्त शक्यता असते. त्यामुळे रात्रीच्या वेळी किंवा संध्याकाळी जास्त चहाचे सेवन करू नये.
जास्त चहा प्यायल्यामुळे शरीराची ऊर्जा कमी होऊन जाते. शरीराची कमी झालेली ऊर्जा वाढवण्यासाठी नियमित लिंबू पाणी किंवा इतर थंड पेयांचे सेवन करावे.