हल्ली कोणत्याही वयातील मुलामुलींचा हार्ट अटॅक येऊन मृत्यू होत असल्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे. हार्ट अटॅक येण्याच्या महिनाभर आधी शरीरात वेगवेगळी लक्षणे दिसू लागतात. रक्तवाहिन्यांमध्ये साचून राहिलेल्या प्लेकमुळे शरीराला आवश्यक तेवढा ऑक्सिजन पुरवठा होत नाही आणि संपूर्ण आरोग्य बिघडून जाते. हृदयाला आवश्यक प्रमाणात ऑक्सिजन पुरवठा न झाल्यामुळे शरीराला हानी पोहचण्याची शक्यता असते. त्यामुळे हार्ट अटॅक येण्याच्या आधी शरीरात दिसून येणाऱ्या या लक्षणांकडे अजिबात दुर्लक्ष करू नका. (फोटो सौजन्य – istock)
शरीरात दिसून येणाऱ्या 'या' लहान लक्षणांकडे अजिबात करू नका दुर्लक्ष, अन्यथा कोणत्याही क्षणी येईल हार्ट अटॅक

हार्ट अटॅक येण्याच्या महिनाभर आधी दिसून येणारे लक्षण म्हणजे झोप पूर्ण झाल्यानंतर सुद्धा शरीरात खूप जास्त थकवा आणि अशक्तपणा जाणवणे. रात्री ७ ते ८ तासांची झोप घेतल्यानंतर सुद्धा अंगातील आळस कमी होत नाही.

मानेचा डावा भाग किंवा डाव्या हातामध्ये वेदना होत असतील तर अजिबात दुर्लक्ष न करता वेळीच उपचार करणे आवश्यक आहे. अन्यथा कोणत्याही क्षणी हार्ट अटॅक येऊ शकतो.

उलट्या, मळमळ किंवा वारंवार अपचनाच्या समस्या उद्भवत असतील तर वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. एखाद्या पदार्थाचा नॉशिया आल्यासारखा वाटणे, काहीच खाण्यापिण्याची इच्छा न होणे.

छातीमध्ये कळ येणे किंवा वेदना झाल्यासारखे वाटणे कायमच हार्ट अटॅकचे लक्षण नसते. पण अपचनाची कोणतीही समस्या न उद्भवता तर छातीमध्ये वेदना होत असतील तर डॉक्टरांचा वेळीच सल्ला घेणे फार आवश्यक आहे.

कोणतीही कष्टाची कामे न करता वारंवार तुम्हाला घाम येत असेल तर हे हार्ट अटॅकचे लक्षण आहे. जीवनशैलीतील बदलांचा आरोग्यावर नकारात्मक परिणाम लगेच दिसून येतो.






