वाढलेले वजन कमी करण्यासाठी महिलांसह पुरुष सुद्धा सतत काहींना काही उपाय करत असतात. कधी महागडा डाएट घेतला जातो तर कधी आहारात बदल करून वेगवेगळ्या पदार्थांचे सेवन केले जाते. अनेक लोक वजन कमी करण्यासाठी सतत जिममध्ये जाऊन व्यायाम करतात. मात्र सतत व्यायाम करणे आरोग्यासाठी चांगले नाही. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला वाढलेले वजन कमी करण्यासाठी उपाशी पोटी मध दालचिनीच्या पाण्याचे सेवन केल्यास शरीराला नेमके कोणते फायदे होतील, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. दालचिनी आणि मध आरोग्यासाठी अतिशय प्रभावी आहे. (फोटो सौजन्य – istock)
शरीरावर वाढलेली अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी उपाशी पोटी प्या मध दालचिनीचे पाणी
शरीरात साचून राहिलेले विषारी घटक बाहेर काढून टाकण्यासाठी मध दालचिनीच्या पाण्याचे सेवन करावे. या पाण्याच्या सेवनामुळे पोट स्वच्छ होते. तसेच शरीराची बिघडलेली पचनक्रिया सुधारण्यास मदत होईल.
वाढलेले वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी नियमित मध दालचिनीचे पाणी उपाशी पोटी प्यायल्यास महिनाभरात फरक दिसून येईल. दालचिनी शरीरातील चयापचय वाढवण्यासाठी मदत करते. मधामध्ये असलेली नैसर्गिक साखर शरीरात ऊर्जा कायम टिकवून ठेवते.
मध दालचिनीच्या पाण्याचे सेवन केल्यामुळे रोगप्रतिकारशक्ती मजबूत होण्यास मदत होते. मधात असलेले अँटीऑक्सिडंट्स आणि दालचिनीचे अँटीबॅक्टेरियल गुणधर्म शरीराचे संक्रमणांपासून रक्षण करते.
रक्तात वाढलेली साखर नियंत्रणात ठेवण्यासाठी दालचिनीचे पाणी प्यावे. दालचिनीचे पाणी प्यायल्यामुळे इन्सुलिन संवेदनशीलता वाढवते, ज्यामुळे मधुमेहाच्या रुग्णांना फायदा होतो.
आतड्यांमध्ये साचून राहिलेले हानिकारक बॅक्टरीया, पोटात साचलेला वायू, बद्धकोष्ठता कमी करण्यासाठी दालचिनी मधाचे पाणी प्यावे. तसेच शरीरात वाढलेले कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवण्यासाठी दालचिनीचे पाणी प्यावे.