टोमॅटोचा ज्यूस प्यायल्यामुळे आरोग्याला होणारे फायदे
टोमॅटोमध्ये आढळून येणारे विटामिन सी आणि लाइकोपीन सारखे अँटीऑक्सिडंट त्वचा हायड्रेट ठेवण्यासाठी मदत करतात. याशिवाय या रसाचे नियमित सेवन केल्यास त्वचेवरील सुरकुत्या कमी होऊन त्वचा अधिक तरुण दिसते.
बिघडलेली पचनक्रिया सुधारण्यासाठी टोमॅटोच्या रसाचे सेवन करावे. टोमॅटोचा रस प्यायल्यामुळे आतड्यांचे आरोग्य निरोगी राहते. यामध्ये आढळून येणारे फायबर बद्धकोष्ठतेच्या समस्येपासून आराम मिळवून देण्यासाठी फायदेशीर आहे.
वजन कमी करण्यासाठी अनेक महिला प्रोटीन ड्रिंक पितात. मात्र हे पिण्याऐवजी तुम्ही टोमॅटोच्या रसाचे सेवन करू शकता. कारण यामध्ये कमी कॅलरीज असतात. तसेच पोट अधिककाळ भरलेले राहते.
टोमॅटोमध्ये मुबलक प्रमाणात विटामिन सी आढळून येते, ज्यामुळे शरीराची रोगप्रतिकारशक्ती सुधारण्यासाठी मदत होते. सर्दी, खोकला आणि इतर विषाणूजन्य संसर्गापासून शरीराचा बचाव होतो.
हृदयाचे आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी नियमित टोमॅटोच्या रसाचे किंवा टोमॅटोचे सेवन करावे. लाइकोपीन, पोटॅशियम आणि फायबर इत्यादी घटक रक्तदाब नियंत्रणात ठेवतात.