कोलेस्ट्रॉलपासून शरीराचे नुकसान होऊन नये म्हणून नियमित खा 'हे' पदार्थ
शरीरात वाढलेले कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी ऑलिव्ह तेल मदत करते. तसेच हृदयाच्या रक्तवाहिन्या सुधारण्यास मदत होते. त्यामुळे जेवण बनवताना इतर कोणत्याही तेलाचा वापर करण्याऐवजी ऑलिव्ह तेलाचा वापर करावा.
ड्रायफ्रूटचे सेवन केल्यामुळे शरीराला मुबलक प्रमाणात फायबर मिळते. त्यामुळे रोजच्या आहारात काजू, बदाम, पिस्ता इत्यादी ड्रायफ्रूटचे सेवन करावे. हे पदार्थ केवळ हृद्यालाच नाहीतर संपूर्ण शरीरासाठी प्रभावी आहेत.
दाहक विरोधी गुणधर्म असलेली लसूण आरोग्यासह इतर आजारांवर सुद्धा प्रभावी आहे. शरीराला आलेली सूज कमी करण्यासाठी आहारात लसणीचे सेवन करावे.
शरीराला आवश्यक असलेले सर्व गुणधर्म माश्यांमध्ये असतात. तसेच माशांमध्ये ओमेगा-३ फॅटी ऍसिड आढळून येते, त्यामध्ये निरोगी चरबी असते. माशांचे सेवन केल्यामुळे शरीरातील रक्तवाहिन्या स्वच्छ राहून चांगले कोलेस्ट्रॉलचे प्रमाण वाढते.
ओट्स, ज्वारी, बाजरी, नाचणी इत्यादी कडधान्यांचे सेवन केल्यामुळे पचनक्रिया सुधारते.रिफाइंड धान्याऐवजी संपूर्ण धान्य खाल्ल्याने हृदयाचे आरोग्य निरोगी राहते. तसेच शरीरात कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहते.