हृदयरोगाचा धोका कमी करण्यासाठी आहारात करा 'या' लाल सुपरफूड्सचे सेवन
जेवणातील सर्वच पदार्थ बनवताना आंबट गोड चवीचा टोमॅटो वापरला जातो. टोमॅटोच्या सेवनामुळे शरीराला भरमसाट फायदे होतात. यामध्ये लायकोपिन नावाचे अँटिऑक्सिडंट मोठ्या प्रमाणावर आढळून येते, ज्यामुळे उच्च कोलेस्ट्रॉल नष्ट होण्यास मदत होते.
डाळिंबाच्या बियांमध्ये पॉलीफेनॉल आणि अँथोसायनिन सारखे विविध प्रकारचे अँटीऑक्सिडंट्स आढळून येतात. यामुळे हृदयाचे रक्तभिसरण सुधारते आणि शरीराला अनेक फायदे होतात. डाळिंबाच्या रसाचे किंवा नियमित एक डाळिंब खाल्ल्यास रक्तवाहिन्यांमध्ये प्लेक जमा होण्याचे प्रमाण कमी होते.
लालचुटुक स्ट्रॉबेरी खायला सगळ्यांचं खूप जास्त आवडते. आंबट गोड चवीच्या स्ट्रॉबेरीचे नाव ऐकल्यानंतर सगळ्यांच्या तोंडाला पाणी सुटते. यामध्ये असलेले फायबर आणि अँथोसायनिन्स घटक शरीरात वाढलेली जळजळ कमी करते.
सकाळी उठल्यानंतर उपाशी पोटी नियमित बीटच्या रसाचे सेवन केल्यास शरीरात साचून राहिलेले विषारी घटक बाहेर पडून जातील आणि शरीर डिटॉक्स होईल. तसेच बीट खाल्ल्यामुळे रक्तवाहिन्यांना आराम मिळतो.
लाल रंगाच्या द्राक्षांमध्ये रेझवेराट्रोल नावाचे एक शक्तिशाली संयुग आढळून येते. यामुळे शरीरात वाढलेली उच्च कोलेस्ट्रॉलची पातळी कमी होऊन रक्तवाहिन्या स्वच्छ होऊन जातात.