फुफ्फुसांचे नुकसान होऊ नये म्हणून आहारात करा 'या' पदार्थांचे सेवन
फुफ्फुसांमध्ये होणारी जळजळ कमी करण्यासाठी आहारात टोमॅटोचे सेवन करणे. टोमॅटो तुमची कच्चा सुद्धा खाऊ शकता. यामुळे फुफ्फुसांचे आरोग्य सुधारेल.
लोहयुक्त बीटरूटचे सेवन केल्यामुळे आरोग्याला अनेक फायदे होतात. फुफ्फुसांमधील रक्तप्रवाह वाढवण्यासाठी आणि फुफ्फुस निरोगी ठेवण्यासाठी बीटरूट किंवा बीटरूटचा रस प्यावा. यामुळे फुफ्फुस डिटॉक्स होण्यास मदत होते.
मधामध्ये दाहक विरोधी गुणधर्म आढळून येतात, ज्यामुळे आरोग्याला अनेक फायदे होतात. त्यामुळे सकाळी उठल्यानंतर कोमट पाण्यात मध आणि लिंबू मिक्स करून प्यावे.
हळदीमध्ये असलेले दाहक विरोधी गुणधर्म आणि ऑक्सिजन फुफ्फुसांचे आरोग्य सुधारण्यासाठी मदत करतात. फुफ्फुसांमध्ये होणारी जळजळ कमी करण्यासाठी आहारात हळदीच्या पाण्याचे सेवन करावे. यामुळे फुफ्फुस डिटॉक्स होतात.
चवीला आंबट गोड अननस सगळ्यांचं खूप आवडते. तसेच यामध्ये ब्रोमेलेन नावाचे एंजाइम आढळून येतो. त्यामुळे आठवड्यातून एकदा अननसचा रस प्यावा.