महाराष्ट्राचे महावस्त्र म्हणून ओळखली जाणारी पैठणी साडी केवळ भारतातच नाहीतर संपूर्ण जगभरात फेमस आहे. कोणत्याही कार्यक्रमात किंवा सणांच्या दिवशी सर्वच महिला पैठणी साडी नेसण्यास प्राधान्य देतात. हातमागावरील पैठणी साडी खरेदी केल्यानंतर त्यावर कोणत्या डिझाईनचा ब्लाऊज शिवावा, असे प्रश्न मनात निर्माण होतात. ब्लाऊजवर हेवी आरी वर्क, पेंटिंग, स्टोन वर्क तर अनेक महिला जरदोसी वर्क करून घेतात. पण हेवी लुक असलेल्या साडीवर भरगच्च डिझाईन केलेला ब्लाऊज शिवून घेण्याऐवजी अतिशय मिनिमल डिझाईन असलेला ब्लाऊज शिवून घ्यावा. चला तर पाहुयात पैठणी साडीवरील स्टायलिश ब्लाऊज. (फोटो सौजन्य – pinterest)
महागड्या पैठणी साडीवर शिवा 'या' डिझाईनचे सुंदर स्टायलिश ब्लाऊज, पारंपरिक साडीवरील मॉर्डन लुक

ब्लाऊज प्रमाणे साडीला सुद्धा लेस लावून दिली जाते. त्यामुळे ब्लाऊज शिवताना वेगवेगळ्या कोणत्याही रंगीत लेसचा किंवा हेवी डिझाईनचा वापर न करता साडीमधील लेसचा वापर करून ब्लाऊज शिवल्यास लुक सुंदर दिसेल.

लग्न सोहळ्यात पैठणी साडी नेसल्यास साडीवरील ब्लाऊजवर आरी वर्क करून घ्यावे. यामुळे लुक रॉयल आणि उठावदार दिसेल. आरी वर्क ब्लाऊजमध्ये सुद्धा अनेक वेगवेगळे पर्याय उपलब्ध आहेत.

हल्ली कॉन्ट्रास्ट ब्लाऊजचा मोठा ट्रेंड आला आहे. गुलाबी रंगाच्या साडीवर हिरवा किंवा पिवळ्या रंगाचा बुटी असलेला ब्लाऊज पैठणी साडीवर अतिशय खुलून दिसेल.

अनेकांना बोटनेक असलेले ब्लाऊज परिधान करायला खूप जास्त आवडतात. त्यामुळे ब्लाऊजच्या मागील गळ्याला मध्यभागी आरी वर्क किंवा इतर डिझाईन करून घेतल्यास ब्लाऊजचा लुक सुंदर दिसेल.

कोणत्याही कार्यक्रमात पैठणी साडीवर लुक मॉर्डन किंवा स्टयलिश हवा असेल तर सीव्हील्स ब्लाऊज परिधान केल्यास लुक हटके दिसेल.






