
सायटिकाची 'ही' लक्षणे दिसू लागल्यास अजिबात करू नका दुर्लक्ष, अन्यथा कायमच राहाल अंथरुणाला खिळून
सायटिका म्हणजे काय?
सायटिका झाल्यानंतर दिसून येणारी लक्षणे?
सायटिकावरील उपचार?
Sciatica Pain: बैठ्या जीवनशैलीचा परिणाम शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर दिसून येतो. तासनतास एका जागेवर बसून राहणे, मोबाईल- लॅपटॉप पाहणे, कामाचा वाढत तणाव इत्यादी कारणांमुळे सायटिकाची लक्षणे वाढू शकतात. पाठीच्या खालच्या भागातून अचानक एक तीव्र कळ मारत ती नितंब आणि पायाच्या मागच्या बाजूने थेट खाली सरकत आल्यासारखे वाटू लागते. या वेदनांना सायटिका असे म्हणतात. हा त्रास काहीवेळा अतिशय अस्वस्थ करणारा असतो. सायटिका झाल्यानंतर शरीरात अनेक बदल होतात. त्यामुळे शरीरात दिसून येणाऱ्या लक्षणांकडे अजिबात दुर्लक्ष न करता वेळीच उपचार करणे आवश्यक आहे. चला तर जाणून घेऊया सायटिकाची मूळ कारणे? सायटिका झाल्यानंतर दिसून येणारी लक्षणे? याबद्दल सविस्तर माहिती.(फोटो सौजन्य – istock)
Delivery Problems: ‘डिलिव्हरीनंतर युरीन लीक होतंय…’ नव्या आईची समस्या, तज्ज्ञांनी केला खुलासा
सायटिक नर्व्ह ही शरीरातील सर्वात लांब आणि जाड मज्जातंतू आहे. ही नर्व्ह पाठीच्या मणक्यापासून सुरू होते आणि नितंब, मांडीच्या मागच्या बाजूने थेट पायाच्या बोटांपर्यंत जाते. त्यामुळे मणक्याच्या ठिकाणी किंवा इतर भागांवर दाब पडल्यास जळजळ किंवा वेदना वाढू लागतात. ही समस्या प्रामुख्याने मणक्यातील गादी सरकल्यामुळे सुद्धा उद्भवते. मणक्याभोवती असलेल्या स्नायूंची झीज किंवा कडकपणा मज्जातंतूला दाबतो, ज्यामुळे सायटिका झाल्यानंतर कोणत्याही एका पायावर जास्तीचा तणाव येतो. याशिवाय वेळीच लक्ष न दिल्यास अंथरुणाला खिळून राहण्याची स्थिती निर्माण होऊ शकते.
पायात मंद किंवा तीव्र कळ मारणे.
पायाच्या पोटरीत/पाऊलात सुया टोचल्यासारख्या संवेदना होणे.
पायाचा काही भाग बधीर होणे.
पाय उचलताना किंवा उभं राहताना अशक्तपणा जाणवणे.
अचानक तीव्र वेदना होणे, इत्यादी लक्षणे दिसू लागल्यास दुर्लक्ष केल्यास गंभीर समस्या वाढू शकतात.
सायटिका झाल्यानंतर वेळीच उपचार करणे फार आवश्यक आहे. शस्त्रक्रियेविना किंवा तीव्र वैद्यकीय उपचारांशिवाय काही आठवड्यांत घरगुती काळजी घेतल्यास सायटिकावर मात करू शकता. दिवसभर अंथरुणावर पडून राहिल्यामुळे स्नायू कडक होतात आणि आजारापासून सुटका मिळवण्यासाठी बराच वेळ लागतो. त्यामुळे रक्तभिसरण सुधारण्यासाठी हलक्या हालचाली करणे फार आवश्यक आहे. १ ते २ दिवसांत तीव्र वेदना आणि सूज कमी करण्यासाठी बर्फाने शेक घ्यावा. बर्फाने शेक घेतल्यास पाठीच्या खालच्या भागातील कडक झालेले स्नायू मोकळे होण्यास मदत होते आणि रक्तभिसरण सुधारेल. याशिवाय अंघोळीच्या पाण्यात मीठ टाकावे आणि गरम पाण्याची अंघोळ करावी.
Ans: सायटिका ही अशी स्थिती आहे ज्यामध्ये सायटिक नर्व्हवर दबाव किंवा चिडचिड झाल्यामुळे कंबरेपासून नितंब आणि पायापर्यंत वेदना जाणवू शकतात.
Ans: कंबरेपासून पायापर्यंत पसरणारी वेदना, मुंग्या येणे, बधिरपणा आणि पायात अशक्तपणा ही सायटिकाची सामान्य लक्षणे आहेत.
Ans: मणक्यांमधील डिस्क सरकणे किंवा फुगणे, मणक्यांच्या आजूबाजूला होणारे बदल आणि सायटिक नर्व्हवर दबाव येणे यांमुळे हा त्रास होऊ शकतो.