Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 2 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ram Navami 2026 : रामायणातील साक्षीदार; ‘या’ 5 मंदिरांमध्ये प्रभू श्रीरामांचे होते प्रत्यक्षात वास्तव्य

आज रामनवमी निमित्त संपूर्ण देशामध्ये उत्साहपूर्व वातावरण आहे. रघुकुलनाथ असलेल्या प्रभू श्री रामांची आज जयंती भक्तीभावाने साजरी केली जातीये. यानिमित्ताने राम मंदिरे सजली असून भक्तीमय वातावरण निर्माण झाले आहे. एकवचनी प्रभू रामांनी वनवास भोगून आपल्या वचनांची पूर्तता केली. याच दरम्यान, माता सीतेच्या शोधार्थ त्यांनी अनेक ठिकाणी वास्तव्य केले. अशी अनेक पवित्रे स्थाने आजही अस्तित्वात आहेत जी प्रभू श्री रामांच्या पवित्र पदस्पर्शाने ती पावन झाली आहेत. यातील काही मंदिरे ही भक्तांना ज्ञात आहेत तर काही अपरिचित राहिली आहेत. आज या लेखाच्या माध्यमातून याच मंदिरांबाबत जाणून घेऊया. (फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

  • By प्रीति माने
Updated On: Mar 26, 2026 | 11:58 AM

five temples in India sanctified by the holy touch of Lord Shri Rama ramnavami vishesh

Follow Us
Follow Us:
1 / 5

अयोध्या : प्रभू रामांची जन्मभूमी - प्रभू श्री रामांचे जन्मस्थान असलेल्या अयोध्येला संघर्षाची मोठी पार्श्वभूमी आहे. अनेक वर्षांच्या संघर्षानंतर अयोध्येमध्ये प्रभू रामांचे भव्य मंदिर उभारण्यात आले आहे. प्रभू रामांची ही जन्मभूमी असल्याची भावना रामभक्तांमध्ये असून या मंदिरांमध्ये बाल स्वरुपामध्ये प्रभू रामांना पुजले जाते. राम जन्मभूमी मंदिर हे केवळ धार्मिक स्थळ नसून भारतीय संस्कृती, श्रद्धा आणि एकतेचे प्रतीक म्हणून ओळखले जाते.

2 / 5

राम राजा मंदिर : देव नाही तर राजा म्हणून सन्मान - मध्य प्रदेशातील ओरछा येथे वसलेले हे प्रभू रामांच्या मंदिरांपैकी एक महत्त्वाचे मंदिर आहे. कारण या मंदिरांमध्ये प्रभू राम हे राजाच्या स्वरुपामध्ये पुजले जातात. वनवासावरुन परत आल्यानंतर प्रभू रामांनी राज्यकारभार हाती घेतला. याच घटनेचे साक्षीदार असलेले हे मंदिर वैशिष्ट्यपूर्ण आहे. प्रभू रामांना दररोज राजदरबारासारखा सन्मान दिला जातो. मंदिरात पोलीस गार्डकडून सलामी दिली जाते, जे या मंदिराचे विशेष वैशिष्ट्य आहे.

3 / 5

कोदंडराम मंदिर : राम-हनुमानाच्या भेटीचे पवित्र स्थान - कर्नाटकातील हम्पी येथे तुंगभद्रा नदीच्या काठी वसलेले एक प्राचीन आणि ऐतिहासिक राम मंदिर म्हणजे कोदंडराम मंदिर. रामाचे निस्सीम भक्त हनुमानाची भेट याच ठिकाणी झाली आहे. रामायणातील कथेनुसार, किष्किंधा प्रदेशात श्रीराम आणि हनुमान यांची भेट याच परिसरात झाली, अशी श्रद्धा आहे. त्यामुळे या स्थळाला धार्मिकदृष्ट्या विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. हे मंदिर विजयनगर साम्राज्याच्या काळात बांधले गेले असून त्याची वास्तुशैली दगडी कोरीव काम, सुंदर शिल्पकला आणि पारंपरिक दक्षिण भारतीय शैलीचे उत्कृष्ट उदाहरण आहे.

4 / 5

सीता रामचंद्रस्वामी मंदिर : वनवासातील साक्षीदार - प्रभू श्री राम हे माता सीता आणि लक्ष्मणसह वनवासावर निघालेले असताना त्यांनी तेलंगणामध्ये वास्तव्य केले होते. पुढे याच परिसरामध्ये हे मंदिर उभारण्यात आले. अत्यंत प्रसिद्ध आणि पवित्र असलेले हे मंदिर भद्राचलम येथे गोदावरी नदीच्या काठी वसलेले आहे. या मंदिराची वास्तुशैली आकर्षक असून दक्षिण भारतीय परंपरेचा प्रभाव त्यात दिसून येतो. रामनवमीचा उत्सव येथे अत्यंत उत्साहात साजरा केला जातो.

5 / 5

रामनाथस्वामी मंदिर : भारतातील अत्यंत पवित्र आणि प्रसिद्ध तीर्थक्षेत्रांपैकी एक म्हणजे रामनाथस्वामी मंदिर. तमिळनाडू राज्यातील रामेश्वरम येथे हे मंदिर १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक मानले जाते. रामायणानुसार, राम मंदिर यांनी लंकेवर जाण्यापूर्वी येथे शिवलिंगाची स्थापना करून पूजा केली, अशी श्रद्धा आहे. त्यामुळे रामेश्वरमला विशेष धार्मिक महत्त्व प्राप्त झाले आहे. भव्य वास्तूकलेचे उत्कृष्ट नमूना म्हणजे रामनाथस्वामी मंदिर. लांबच लांब दालने (कॉरिडॉर), सुंदर कोरीव स्तंभ आणि पारंपरिक दक्षिण भारतीय शैली या मंदिराला आणखी विशेष बनवते.

Web Title: Five temples in india sanctified by the holy touch of lord shri rama ramnavami vishesh

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 26, 2026 | 11:58 AM

Topics:  

  • Ayodhya ram mandir
  • ram mandir
  • shree Ram

संबंधित बातम्या

‘राम मंदिरातून 20 हजार कोटींची दान चोरी, गैरव्यवहारात बड्या नेत्यांचाही समावेश’; समाजवादी पक्षाच्या नेत्याचा दावा
1

‘राम मंदिरातून 20 हजार कोटींची दान चोरी, गैरव्यवहारात बड्या नेत्यांचाही समावेश’; समाजवादी पक्षाच्या नेत्याचा दावा

Ram Mandir Scam: २ जागांवरून सत्तेचे शिखर गाठलेल्या भाजपची ‘अग्निपरीक्षा’; राम मंदिर निधी वादाने राजकारण तापले
2

Ram Mandir Scam: २ जागांवरून सत्तेचे शिखर गाठलेल्या भाजपची ‘अग्निपरीक्षा’; राम मंदिर निधी वादाने राजकारण तापले

‘राम मंदिरातील देणग्यांच्या हिशोबावर प्रश्नचिन्ह’; राज ठाकरे यांचा गंभीर आरोप, केंद्र सरकारवरही साधला निशाणा
3

‘राम मंदिरातील देणग्यांच्या हिशोबावर प्रश्नचिन्ह’; राज ठाकरे यांचा गंभीर आरोप, केंद्र सरकारवरही साधला निशाणा

SBI संशयाच्या भोवऱ्यात… Ram Mandir चंदा चोरीचे कनेक्शन थेट बँकेशी? संशय असूनही कारवाई का झाली नाही?
4

SBI संशयाच्या भोवऱ्यात… Ram Mandir चंदा चोरीचे कनेक्शन थेट बँकेशी? संशय असूनही कारवाई का झाली नाही?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.