Tech Tips: ऑनलाईन वेबसाईटवरून स्मार्टफोन खरेदी करण्यापूर्वी लक्षात ठेवा महत्त्वाच्या टीप्स, अन्यथा होईल मोठं नुकसान
असे अनेक लोकं असतात जे केवळ ऑफर्स आणि डिस्काऊंट पाहून स्मार्टफोनची खरेदी करतात. तुम्ही देखील यांपैकी एक असाल तर असं करणं तुम्हाला देखील महागात पडू शकतं.
ऑनलाईन स्मार्टफोन खरेदी करताना केवळ ऑफर्स आणि डिस्काऊंट पाहू नका तर फोनचे स्पेसिफिकेशन, ब्रँडचा विश्वास लॉन्ग टर्म परफॉर्मेंस या सर्वांबाबत माहिती घ्या.
अनेकदा सेलमध्ये लोकांना जुने मॉडेल्स विकले जातात. या स्मार्टफोम्सना लेटेस्ट अपडेट्स आणि सिक्योरिटी पॅच दिलं जात नाही. ज्यामुळे स्मार्टफोनच्या परफॉर्मेंस आणि सिक्योरिटीवर परिणाम होतो.
सेलमध्ये अनेकजण त्यांचा जुना फोन एक्सचेंज करतात. पण त्याची योग्य किंमत पाहत नाहीत.
स्मार्टफोन खरेदी करण्यापूर्वी यूजर रिव्यू, वीडियो रिव्यू आणि रेटिंग्स तापासा.
स्मार्टफोनचा परफॉर्मेंस, कॅमेरा क्वालिटी आणि बॅटरी बॅकअप याबद्दल माहिती घ्या.