जास्त वेळ फ्रिजमध्ये ठेवलेले 'हे' पदार्थ आरोग्यासाठी ठरतील घातक
चुकूनही सोलून ठेवलेला लसूण फ्रिजमध्ये ठेवू नये. लसुणचा उग्र वास संपूर्ण फ्रिजमध्ये येऊन इतर पदार्थ खराब होण्याची शक्यता असते. त्यामुळे फ्रिजमध्ये लसूण किंवा लसुणचा वापर करून बनवलेले पदार्थ ठेवू नये.
शिजवलेले अन्नपदार्थ फ्रिजमध्ये ठेवू नये. फ्रिजमध्ये ठेवल्यामुळे त्यातील पौष्टिक आणि शरीरासाठी आवश्यक असलेले सर्व घटक नष्ट होऊन जातात.
दूध, दही, पनीर आणि लोणी इत्यादी दुधापासून बनवलेले पदार्थ फ्रिजमध्ये ठेवू नये. यामुळे पदार्थांमध्ये विषारी घटक तयार होतात. याशिवाय दुधाच्या पदार्थांमध्ये झपाट्याने जंतूंची वाढ होते.
कापून ठेवलेली फळे चिकुनही फ्रिजमध्ये ठेवू नका. यामुळे फळांचा रंग हळूहळू बदलू लागतो. तसेच यामध्ये असलेली नैसर्गिक साखर नष्ट होऊन बॅक्टरीया वाढू लागतात. सफरचंद, केळी, पपई, खरबूज, कलिंगड इत्यादी फळे फ्रिजमध्ये ठेवू नये.
रात्रीच्या जेवणात किंवा इतर वेळी खाण्यासाठी बनवलेला भात चुकूनही फ्रिजमध्ये ठेवू नका. यामुळे पचनक्रिया बिघडण्याची शक्यता असते. फ्रिजमध्ये ठेवलेल्या भातामध्ये विषारी पदार्थ तयार होतात.