
महिलांच्या आरोग्यासाठी वरदान ठरतील 'हे' पदार्थ
आयुर्वेदातील औषधी वनस्पतींचे सेवन केल्यामुळे शरीराला अनेक फायदे होतात. शतावरी खाल्ल्यामुळे महिलांची प्रजनन क्षमता, मानसिक आरोग्य आणि हार्मोन्स बॅलन्स होण्यास मदत होते. शरीरात वाढलेली उष्णता कमी करण्यासाठी शतावरी खाण्याचा सल्ला दिला जातो. यामुळे उष्णता किंवा चिडचिडपणा कमी होण्यास मदत होते. एक ग्लास अर्धा चमचा शतावरी पावडर टाकून नियमित प्यायल्यास महिलांच्या शरीराला अनेक फायदे होतील.
काळ्या तिळांचा वापर आहारात फारसा केला जात नाही. पण हेच तीळ महिलांच्या आरोग्यासाठी अतिशय पोषक ठरतात. यामध्ये कॅल्शिअम, आयर्न आणि हेल्दी फॅट मोठ्या प्रमाणावर आढळून येतात. वय वाढल्यानंतर हातांमध्ये वाढलेल्या वेदना कमी करण्यासाठी काळे तीळ खाण्याचा सल्ला दिला जातो. काळे तीळ खाल्यामुळे हार्मोन्सचे संतुलन सुधारते. डिलीव्हरीनंतर किंवा मेनोपॉजवेळी महिलांनी आहारात काळे तीळ खावेत. हे तीळ तुम्ही भाज्या किंवा सॅलडमध्ये टाकून सुद्धा खाऊ शकता.
विटामिन सी गुणधर्मांनी समृद्ध असलेला आवळा त्वचा आणि केसांसाठी अतिशय फायदेशीर ठरतात. शरीराची बिघडलेली पचनक्रिया सुधारण्यासाठी आवळ्याचे सेवन करावे. याशिवाय चेहऱ्यावर वाढलेले ऍक्ने आणि पिंपल्स कमी करण्यासाठी सकाळी उठल्यानंतर उपाशी पोटी आवळ्याच्या रसाचे सेवन करावे.
अनेक लोक रक्तात वाढलेली साखर नियंत्रणात ठेवण्यासाठी नाचणीची भाकरी किंवा नाचणीपासून बनवलेल्या इतर पदार्थांचे सेवन करतात. नाचणीमध्ये कॅल्शिअम, आयर्न आणि अमीनो अॅसिड मोठ्या प्रमाणावर आढळून येते, ज्यामुळे हाडे मजबूत राहतात आणि झोपेची गुणवत्ता सुधारण्यास मदत होते. याशिवाय आहारात तुम्ही नियमित एक चमचा तूप खाल्यास शरीर आतून हायड्रेट राहण्यास मदत होईल.
आहार घेताना लक्षात ठेवण्यासारख्या गोष्टी:
आहारात सर्व पोषक तत्वांचा समावेश असावा.वेळेवर आणि नियमितपणे जेवण करावे. जंक फूड आणि प्रक्रिया केलेले अन्नपदार्थ खाणे टाळावे.
मासिक पाळी म्हणजे काय?
मासिक पाळी म्हणजे महिलेच्या शरीरात दर महिन्याला होणारे बदल, ज्यामुळे गर्भधारणेसाठी गर्भाशय तयार होते. यात गर्भाशयाचं अस्तर बाहेर पडतं, ज्याला आपण मासिक पाळी म्हणतो.
मासिक पाळी दरम्यान काय काळजी घ्यावी?
स्वच्छतेची विशेष काळजी घेणे, योग्य सॅनिटरी पॅड वापरणे, आणि विश्रांती घेणे महत्त्वाचे आहे.