अनेक राज्ये, शहरे आणि शेकडो गावे असलेला भारत हा विविधतेने नटलेला देश आहे. आपल्या देशातील गावांची नावे बहुतेकदा त्या प्रदेशातील श्रद्धा, भाषा, सभ्यता आणि संस्कृती दर्शवतात. कधीकधी ही नावे इतकी अनोखी आणि मजेदार असतात की ऐकणाऱ्याचं हसू आवरणार नाही. आपल्या देशात अशी काही गावं आहेत, ज्यांची नाव इतकी विचित्र आहेत की ती ऐकून हसणे थांबवणे कठीण होते. अशी काही नावे आहेत जी लोकांना बोलणं देखील अवघड आहे. आज आपण अशाच गावांच्या नावांबद्दल जाणून घेऊया. (फोटो सौजन्य – Pinterest)
Funny Village Name: ही आहेत भारतातील गावांची विचित्र नावं, ऐकून हसू आवरणार नाही

तेलंगणातील रंगारेड्डी जिल्ह्यातील हयातनगर तालुक्यात एक गाव आहे, या गावाचं नाव टट्टी खाना आहे. हे अनोखे नाव ऐकून लोक आश्चर्यचकित होतात. आता कल्पना करा, या गावातील रहिवाशांचा पत्ता सांगताना त्यांची परिस्थिती किती विचित्र असेल!

झारखंडची राजधानी रांचीमध्ये चुटिया नावाचे एक ठिकाण आहे. हे नाव ऐकून अनेकांना हसू येते.

हिमाचल प्रदेशात पूप नावाचे एक छोटेसे गाव आहे. इंग्रजीमध्ये "poop" म्हणजे विष्ठा. हे गाव अक्रोडाच्या सुंदर बागा आणि द्राक्षांच्या बागांसाठी प्रसिद्ध आहे. हे नाव ऐकल्यानंतर तुम्हाला नक्कीच विचित्र वाटेल, परंतु हे ठिकाण नैसर्गिक सौंदर्यासाठी ओळखले जाते.

झारखंडच्या हजारीबाग जिल्ह्यात दारू नावाचे एक गाव आहे. या गावात सर्वत्र दारू मिळत नाही. नाव थोडे विचित्र वाटले तरी हे गाव स्वतःची वैशिष्ट्ये आणि संस्कृतीत व्यस्त आहे.

कर्नाटक राज्यात एक गाव आहे, त्याचे नाव आहे कुट्टा. या गावाचं नाव ऐकताच लोकांना हसू फुटतं.

पनौती या शब्दाचा अर्थ "अशुभ" असा आहे आणि भारतात पनौती नावाचे एक गाव आहे. हे गाव पश्चिम बंगालच्या उत्तर दिनाजपूर जिल्ह्यात आहे.






