Girl in the Box : 7 वर्षांची बंदिवासातील किंकाळी... प्रत्येक मुलीने पाहायला हवी, सत्य घटनेवर आधारित थरारक कैदकथा
अनोळखी व्यक्तीकडून लिफ्ट मागून कोलीन स्टॅन या २२ वर्षीय मुलीने आपल्या जीवनातील सर्वात मोठी चूक केली, ज्याची शिक्षा तिला पुढे जाऊन भोगावी लागली. ज्या जोडप्याकडून तिने लिफ्ट मागितली त्यांनी तिचे अपहरण केले आणि त्यांच्या घरी नेऊन तिला एक लाकडी पेटीत बंदिस्त करून ठेवले. हा बंदिवास काही वेळचा नसून तिला यात तब्बल ७ वर्षे कैदेत ठेवण्यात आले.
ही एक सत्य घटना आहे, जी कोलीनच्या संघर्षाची आहे. कोलिनचे अपहरण केल्यानंतर तिचा मानसिक आणि शारीरिक छळ करण्यात आला. चित्रपटातील दृश्ये फारच दयनीय असून यातील काही सीन तुम्हाला हादरवू शकतात.
Addie Kehr हिने कोलीनची भूमिका साकारली आहे, जी खूप प्रभावी आहे. तिच्या अभिनयातून असहायता, भीती आणि आत्मविश्वासाची झलक स्पष्टपणे दिसते. Zane Grey पति ज्याने कोलिनचे अपहरण केले त्याची भूमिका निभावली आहे, त्याने भूमिकेला योग्य क्रूरता दिली आहे.
स्टीफन केम्प यांच्या दिग्दर्शनाखाली हा चित्रपट एक थरारक अनुभव देतो. संथ पण रोचक कथावस्तू प्रेक्षकाला शेवटपर्यंत खिळवून ठेवते. पटकथा अत्याचाराचे वर्णन करतानाही अश्लील न वाटता वास्तव मांडते.
चित्रपट पाहताना प्रेक्षकाच्या मनात अस्वस्थता निर्माण होते. कोलीनच्या धैर्याचं आणि सहनशीलतेचं चित्रण प्रेरणादायी आहे, पण एकाच वेळी दुःखदही आहे.
चित्रपटातील सेट, विशेषतः लाकडी पेटीचा बंदिस्त भाग, खूप प्रभावीपणे दाखवला आहे. तरुणपणात आपण कशा शुल्लक चुका करतो आणि त्याचा परिणाम आपल्याला पुढे जाईन भोगावा लागतो ते चित्रपट उत्तमरित्या दाखवण्यात आलं आहे.
"Girl in the Box" हा चित्रपट मन हेलावून टाकणारा आहे. सच्च्या घटनेवर आधारित असल्याने तो अधिक परिणामकारक ठरतो. एकदा तरी पाहावा असा हा चित्रपट आहे, पण लक्षात ठेवा हृदयद्रावक प्रसंगांसाठी मानसिक तयारी गरजेची आहे.