लहान मुलांना सकाळच्या नाश्त्यात द्या 'हे' निरोगी आणि चविष्ट पदार्थ
सकाळच्या नाश्त्यात मुलांना पोहे खाण्यास द्यावे. कारण पोहे सहज पचन होतात. यामध्ये कार्बोहायड्रेट्स, लोह आणि फायबर इत्यादी आवश्यक घटक आढळून येतात. सकाळच्या वेळी पोटभर नाश्ता केल्यास शरीराला ऊर्जा मिळेल.
नेहमीच तांदळाच्या मिश्रणाची इडली खाऊन कंटाळा आल्यानंतर तुम्ही ओट्स इडली बनवू शकता. हा पदार्थ वजन कमी करण्यासाठी सुद्धा खाल्ला जातो. ओट्स खाल्यामुळे शरीरात ऊर्जा टिकून राहते आणि लवकर भूक लागत नाही.
मैद्याच्या पिठाचा वापर न करता लहान मुलांना मल्टीग्रेन पीठ वापरून पराठा बनवून द्यावा. वेगवेगळ्या भाज्या आणि पनीर टाकून बनवलेला पराठा सकाळच्या नाश्त्यासाठी अतिशय उत्तम पर्याय आहे.
सकाळच्या नाश्त्यात कायमच एक तरी फळ खावे. वेगवेगळी फळे आणि दही मिक्स करून खाल्यास शरीरात ऊर्जा टिकून राहील, ज्यामुळे मुलं कायमच निरोगी राहतील.
मोड आलेले कडधान्य शरीरासाठी प्रभावी ठरतात. यामध्ये प्रथिने आणि जीवनसत्वे मोठ्या प्रमाणावर आढळून येतात. कडधान्य खाल्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती सुद्धा वाढते.