
दुधी भोपळ्याची साल फेकून न देता सोप्या पद्धतीमध्ये बनवा चटकदार सालीची चटणी
रोजच्या आहारात वेगवेगळ्या पदार्थांचे आणि भाज्यांचे सेवन केले जाते. कधी फळभाज्या खाल्ल्या जातात तर कधी पालेभाज्या खाल्या जातात. पण लहान मुलांसह मोठ्यांना भाज्या खायला अजिबात आवडत नाही. भाज्यांची साल काढल्यानंतर ती लगेच फेकून दिली जाते. दुधी भोपळा, लाल भोपळा, बटाटा इत्यादी अनेक भाज्या घरात आणल्यानंतर त्यांची साल काढून फेकून दिली जाते. पण दुधी भोपळ्याची साल टाकून न देता तुम्ही त्यापासून अनेक वेगवेगळे पदार्थ बनवू शकता. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये दुधी भोपळ्याच्या सालीची चटकदार चटणी बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. दुधी भोपळा आरोग्यासाठी अतिशय पौष्टीक आहे. यामध्ये भरपूर पाणी असते. शरीरात पाण्याची कमतरता निर्माण झाल्यानंतर दुधी भोपळ्याचा रस पिण्याचा सल्ला दिला जातो. पण घरातील मुलांना किंवा मोठ्यांना दुधी भोपळा खायला आवडत नसेल तर तुम्ही सोप्या पद्धतीमध्ये सालींची चटणी बनवू शकता. चला तर जाणून घेऊया सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – pinterest)
Winter Recipe : उत्तर भारताची पारंपरिक डिश ‘मटार निमोना’; थंडीच्या दिवसांत नक्की घरी बनवा