गणपती बाप्पाचे लवकरच आगमन होणार आहे. सणावारांच्या दिवसांमध्ये सर्वच महिला साड्यांची खरेदी करतात. काठपदर, पैठणी, बनारसी इत्यादी विविध फ्रॅब्रिकमधील साड्यांची खरेदी आवर्जून केली जाते. साडी खरेदी झाल्यानंतर सगळ्यात महत्वाचे काम म्हणजे साडीवरील ब्लाऊज. काठपदरच्या साडीवर नेमका कोणत्या डिझाईनचा ब्लाऊज शिवून घ्यावा? यामध्ये खूप जास्त गोंधळ निर्माण होतो. गणपती उत्सवात साडीवरील लुक खुलून दिसण्यासाठी सध्या ट्रेडिंग असणाऱ्या या ब्लाऊज डिझाईनची नक्की करा निवड. यामुळे तुमचा लुक चारचौघांमध्ये गेल्यानंतर अतिशय सुंदर आणि हटके दिसेल. (फोटो सौजन्य – pinterest)
काठपदरच्या साडीला द्या मॉडर्न टच! 'या' ब्लाऊज डिझाईन्सने खुलून दिसेल आकर्षक लुक

काठपदरच्या साडीवर या डिझाईनचे ब्लाऊज शिववावे. पान शेप असलेला गळा कोणत्याही साडीवर उठावदार दिसतो. जास्त भरगच्च ब्लाऊज नको असल्यास ही डिझाईन उत्तम आहे.

इतरांपेक्षा हटके आणि युनिक ब्लाऊज हवा असल्यास फुलांच्या पाकळ्यांचा शेप तुम्ही ब्लाऊजच्या पुढच्या गळ्याला देऊ शकता. याशिवाय मोत्यांऐवजी सोनेरी मण्यांचे लटकन लावल्यास ब्लाऊज सुंदर दिसेल.

अनेकांना बोट नेक ब्लाऊज खूप जास्त आवडते. बोट नेक ब्लाऊज कोणत्याही साडीवर शोभून दिसते. याशिवाय पाठीमागील प्लेन ब्लाऊजवर हँड पेंटिंग आणि धाग्यांची नक्षी सुद्धा करून घेऊ शकता.

चौकोनी आकारातील ब्लाऊज डिझाईन कोणत्याही साडीवर शोभून दिसते. त्यामुळे ब्लाऊजच्या बाह्यांना हलकीशी झालर लावून ब्लाऊज आणखीनच आकर्षक करू शकता.

दाक्षिणात्य साडीवर किंवा हाफ साडीच्या ब्लाऊजसाठी तुम्ही या डिझाईनची निवड करू शकता. ही डिझाईन कोणत्याही साडीसाठी उत्तम आहे.






