आयुर्वेदिक गुणधर्मांनी समृद्ध असलेली ग्रीन टी 'या' लोकांच्या आरोग्यासाठी घातक
बद्धकोष्ठता,आम्लता किंवा गॅस इत्यादी समस्यांपासून त्रस्त असलेल्या लोकांनी ग्रीन टी चे सेवन करू नये. यामुळे पचनाच्या समस्या आणखीनच वाढू शकतात.कारण यामध्ये टॅनिन नावाचा घटक आढळून येतो.
गर्भवती किंवा स्तनपान करणाऱ्या महिलांनी ग्रीन टी चे अजिबात सेवन करू नये. यामध्ये असलेले कॅफ़िनमुळे जीवाला धोका निर्माण होऊ शकतो.
वारंवार शरीरात अशक्तपणा किंवा थकवा जाणवत असेल तर ग्रीन टी चे अजिबात सेवन करू नये. यामुळे शरीरातील लोहाचे शोषण कमी होते.त्यामुळे दिवसातून एकदा किंवा दोनदा ग्रीन टी प्यावा.
डोकेदुखी किंवा मायग्रेनचा त्रास असलेल्या लोकांनी अजिबात ग्रीन टी चे सेवन करू नये. यामध्ये असलेले कॅफिन मायग्रेनला चालना देण्यास मदत करते. तसेच थायरॉईड असलेल्या लोकांनी ग्रीन टी पिणे टाळावे.
ग्रीन टी चे सेवन दिवसातून एकदा किंवा दोनदाच करावे. सारखी सारखी ग्रीन टी पिऊ नये. यामुळे शरीराला हानी पोहचते. तसेच ग्रीन टी पिण्याआधी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.