
सकाळी उठल्यानंतर पोट व्यवस्थित स्वच्छ होत नसेल तर उपाशी पोटी करा 'या' हर्बल टी चे सेवन
पचनक्रिया सुधारण्यासाठी घरगुती उपाय?
आतड्यांमधील घाण बाहेर काढून टाकण्यासाठी उपाय?
पोट स्वच्छ करण्यासाठी कोणते हर्बल टी प्यावे?
सकाळी उठल्यानंतर दिवसाची सुरुवात आनंद आणि उत्साहाने जावी, प्रत्येकाला कायमच वाटत असतं. यासाठी अनेक लोक व्यायाम करणे, उपाशी पोटी कोमट पाण्याचे किंवा डिटॉक्स ड्रिंकचे सेवन करणे इत्यादी अनेक गोष्टी केल्या जातात. पण तरीसुद्धा पोट व्यवस्थित स्वच्छ होत नाही. आतड्यांमधील घाण पोटात तशीच साचून राहिल्यामुळे शरीराची पचनक्रिया पूर्णपणे बिघडून जाते. ज्यामुळे सकाळीच शरीरात जडपणा, थकवा, चिडचिड आणि भूक न लागणे इत्यादी अनेक त्रास सहन करावे लागतात. वारंवार पोट व्यवस्थित स्वच्छ न झाल्यामुळे बद्धकोष्ठता, गॅस, अपचन, पोटात दुखणे इत्यादी अनेक समस्या उद्भवू लागतात. काहीवेळा हार्मोन्सच्या असंतुलनामुळे शरीराच्या पचनक्रियेवर गंभीर परिणाम दिसून येतात. त्यामुळे आहारात कायमच सहज पचन होणाऱ्या पदार्थांचे सेवन करावे.(फोटो सौजन्य – istock)
लहान मुलांपासून ते अगदी वयस्कर लोकांपर्यंत सगळ्यांचं बद्धकोष्ठता आणि अपचनाची समस्या उद्भवते. आतड्यांमधील विषारी घाण पोटात तशीच साचून राहिल्यामुळे सतत आंबट ढेकर येणे, ऍसिडिटी, गॅस, छातीमध्ये जळजळ होणे इत्यादी अनेक समस्या उद्भवू लागतात. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला सकाळी उठल्यानंतर पोटातील घाण स्वच्छ करण्यासाठी उपाशी पोटी कोणत्या हर्बल टी चे सेवन करावे, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. हर्बल टी च्या सेवनामुळे आतड्यांमध्ये चिकटून राहिलेला विषारी मल बाहेर पडून जातो आणि शरीर स्वच्छ होते. सकाळी उठून कायमच दुधाचा चहा पिण्याऐवजी हर्बल टी किंवा औषधी पेयांचे सेवन करावे.
सकाळी उठल्यानंतर उपाशी पोटी पुदिन्याचा चहा प्यायल्यास आतड्यांमध्ये साचून राहिलेली घाण बाहेर पडून जाण्यास मदत होते. याशिवाय पुदिन्याच्या पानांमध्ये असलेला थंडावा उष्णता कमी करण्यासाठी मदत करतो. यामध्ये असलेल्या मेंथॉल गुणधर्मांमुळे गॅस, अपचन आणि पोट फुगणे इत्यादी सर्वच समस्यांपासून सुटका मिळते. पुदिन्याच्या पानांचा चहा बनवण्यासाठी सर्वप्रथम, टोपात पाणी गरम करून त्यात मूठभर पुदिन्याची पाने घालून उकळवून घ्या. पाण्याला उकळी आल्यानंतर गॅस बंद करून पाणी गाळून घ्या. पुदिन्याच्या पानांचा चहा पिण्यासाठी तयार आहे. हा चहा सकाळ संध्याकाळ नियमित प्यायल्यास शरीरात अनेक बदल दिसून येतील.
आतड्यांमध्ये साचून राहिलेली घाण बाहेर काढून टाकण्यासाठी जेष्ठमधाच्या चहाचे सेवन करावे. आयुर्वेदिक गुणधर्मांनी समृद्ध असलेले जेष्ठमधाचा चहा शरीरासाठी अतिशय प्रभावी ठरेल. या चहाच्या सेवनामुळे पोटात वाढलेली जळजळ कमी होते. तसेच ऍसिडिटी, अपचन आणि गॅसच्या समस्येपासून आराम मिळवण्यासाठी जेष्ठमधाचा चहा प्यावा.
शरीरासाठी आलं अतिशय प्रभावी आहे. आल्यामध्ये असलेले दाहक विरोधी गुणधर्म शरीरातील घाण बाहेर काढून टाकण्यासाठी मदत करतात. याशिवाय आल्याच्या सेवनामुळे शरीराला भरमसाट फायदे होतात. सकाळी उठल्यानंतर नियमित आल्याचा चहा किंवा आल्याचा रस प्यायल्यास शरीरातील घाण बाहेर पडून जाईल आणि आरोग्य सुधारेल.
टोपात पाणी गरम करून त्यात एक चमचा जिरं घालून व्यवस्थित उकळवून घ्या. पाण्याला उकळी आल्यानंतर गॅस बंद करून पाणी गाळून सेवन करावे. जिऱ्याच्या पाण्याचे सेवन केल्यामुळे आतड्यांमध्ये साचून राहिलेले विषारी घटक बाहेर पडून जातील आणि शरीर स्वच्छ होईल. याशिवाय शरीराची कमकुवत झालेली पचनक्रिया सुधारण्यासाठी जिऱ्याचे पाणी प्यावे.
Ans: जिथे आठवड्यातून तीनपेक्षा कमी वेळा आतड्याची हालचाल होते. यात शौच कठीण, कोरडी आणि बाहेर काढायला त्रासदायक होते.
Ans: आहारात फायबरचे प्रमाण कमी असणे आणि पुरेसे द्रवपदार्थ न पिणे.
Ans: आठवड्यातून तीनपेक्षा कमी वेळा शौचास होणे.