Chia Seeds हा पदार्थ सध्या ट्रेंडिंगमध्ये आहे आणि डाएट करणाऱ्या प्रत्येकाला हा पदार्थ माहीत आहे. रोज चिया सीड्स खाण्याचे नेमके फायदे काय आहेत आणि आरोग्याला याचा कसा फायदा मिळतो जाणून घ्या. चिया सीड्स या पोटाला थंडावा देतात आणि अनेक आजारांवरही या गुणकारी ठरतात. अनेकांना चिया सीड्स कशा पद्धतीने खायच्या हे माहीत नसते. तुम्ही रात्रभर पाण्यात चिया सीड्स भिजवून सकाळी खाऊ शकता. दुधातूनही तुम्ही याचा वापर करून खाऊ शकता, जाणून घ्या अधिक फायदे (फोटो सौजन्य - iStock)
चिया सीड्समध्ये फायबर, ओमेगा-३ फॅटी अॅसिड, प्रथिने, कॅल्शियम आणि अँटिऑक्सिडंट्स यांसारख्या अनेक पोषक तत्वांचा लक्षणीय प्रमाणात समावेश असतो. चिया सीड्स खाण्याचे काही आरोग्यदायी फायदे जाणून घेऊया

तुम्हाला तुमच्या वजन कमी करायचे आहे का? तसे असल्यास, तुमच्या रोजच्या आहारात चिया सीड्सचा समावेश करण्याचा विचार करा. चिया सीड्समध्ये फायबर असते, जे तुम्हाला जास्त वेळ पोट भरल्यासारखे वाटण्यास आणि भूक नियंत्रित करण्यास मदत करते

कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रित करण्यासाठी Chia Seeds चे सेवन केले जाऊ शकते, म्हणजेच त्या तुमच्या हृदयाच्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरू शकतात. मधुमेहींनाही चिया सीड्सचे सेवन करण्याचा सल्ला दिला जातो, कारण त्यांमध्ये औषधी गुणधर्म असतात

Chia Seeds तुमच्या आतड्यांच्या आरोग्यासाठीदेखील खूप फायदेशीर ठरू शकतात. तुम्हाला वारंवार बद्धकोष्ठतेचा त्रास होतो का? तसे असल्यास, पोषक तत्वांनी समृद्ध असलेल्या चिया सीड्सचे सेवन केल्याने ही समस्या कमी होण्यास मदत होऊ शकते

आरोग्य तज्ज्ञांच्या मते, हाडे मजबूत ठेवण्यासाठी तुमच्या रोजच्या आहारात चिया सीड्सचा समावेश केला जाऊ शकतो

तथापि, हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी आहे; कोणताही उपाय अवलंबण्यापूर्वी कृपया डॉक्टरांचा सल्ला घ्या






