Health Tips: हिवाळ्यात थंडीमुळे अनेकदा तहान कमी लागते आणि त्यामुळे आपण दिवसभर पुरेसे पाणी पीत नाही. मात्र, शरीर हायड्रेट ठेवण्यासाठी थंडीतही योग्य प्रमाणात पाणी पिणे गरजेचे आहे. जाणून घेऊया हिवाळ्यात पाण्याची कमतरता टाळण्यासाठी कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी.
शरीर हायड्रेट ठेवण्यासाठी फॉलो करा या टिप्स

कोमट पाण्याची सवयः थंड पाण्याऐवजी दिवसभर कोमट पाणी प्या, यामुळे पचन सुधारते आणि घसाही चांगला राहतो.

गरमागरम सूप आणि हर्बल टीः साध्या पाण्याला पर्याय म्हणून आलं गवती चहा, ग्रीन टी, जिरे धणे पाणी किंवा पौष्टिक व्हेजिटेबल सूप घ्या

कॅफिनवर नियंत्रण ठेवाः थंडी पळवण्यासाठी वारंवार चहा कॉफी पिणं टाळा, कारण त्यामुळे शरीरातील पाणी कमी होते

रसदार फळेः हिवाळ्यात संत्री, मोसंबी, डाळिंब आणि पेरू यांसारख्या फळांचा आहारात समावेश करा.

वेळेचे नियोजनः तहान लागण्याची वाट न पाहता दर एक ते दोन तासांनी पाणी पिण्याचा नियम पाळा






