भारतीय संस्कृतीमध्ये लग्न झाल्यानंतर नवरीच्या गळ्यात मंगळसूत्र घातले जाते. मंगळसूत्र ही लग्नाची निशाणी आहे. लग्न झाल्यानंतर सर्वच महिलांच्या गळ्यात वेगवेगळ्या डिझाइन्सचे मंगळसूत्र असतात. मंगळसूत्र परिधान केल्यामुळे पतीचे आयुर्मान वाढते आणि त्यांच्यासमोर येणारी प्रत्येक समस्या दूर होण्यास मदत होते, असे मानले जाते. मात्र मंगळसूत्र गळ्यात घालताना त्यावर गाठी मारल्या जातात. आज आम्ही तुम्हाला गळ्यात मंगळसूत्र बांधताना किती गाठी मारल्या जातात? याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत.(फोटो सौजन्य – pinterest)
लग्नात मंगळसूत्र घालताना किती गाठी बांधल्या जातात?

लग्न झाल्यानंतर नवरीच्या गळ्यात सोन्याचे मंगळसूत्र घातले जाते. याशिवाय लग्नात नवरीच्या गळ्यात उलटे मंगळसूत्र घालण्याची परंपरा आहे.

शास्त्रांनुसार, मंगळसूत्र घालताना गळ्यात तीन गाठी मारल्या जातात. या तीन गाठींना विशेष महत्व सुद्धा आहे. मंगळसूत्राला बांधल्या जाणाऱ्या तीन गाठी जीवनातील 3 महत्त्वाच्या घटकांचे प्रतीक मानल्या जातात.

लग्न झाल्यानंतर पतीपत्नीमध्ये तीन गोष्टींची देवाणघेवाण केली जाते. मनसा म्हणजे विचार, वाचा म्हणजे वाणी आणि कर्मण म्हणजे कृती.

पतिपत्नीचे नाते तीन घटकांच्या आधारावर नेहमीच चालत असते. प्रेमाचे हेच नातं अजूनही बहरण्यासाठी मंगळसूत्राला तीन गाठी बांधल्या जातात.

तिसऱ्या गाठीच्या प्रभावामुळे पतिपत्नी एकमेकांना चांगले कर्म आणि अध्यात्माकडे नेण्यास मदत करतात. ज्यामुळे वैवाहिक जीवन अत्यंत सुखी जाते.






