e-Passport Online : भारतात 'ई-पासपोर्ट' सुविधा सुरू करण्यात आली आहे. या डिजिटल चिपयुक्त पासपोर्टमुळे तुमची माहिती अधिक सुरक्षित राहते. या फोटोस्टोरीमध्ये जाणून घ्या, ई-पासपोर्ट म्हणजे काय, त्यासाठी ऑनलाईन अर्ज कसा करावा. ( सौजन्य - सोशल मीडिया )

ई-पासपोर्ट दिसायला सामान्य पासपोर्टसारखाच असतो, मात्र त्याच्या मुखपृष्ठावर एक छोटी सोनेरी चिप बसवलेली असते.

या खास चिपमध्ये व्यक्तीची वैयक्तिक माहिती, बायोमेट्रिक डेटा आणि बोटांचे ठसे डिजिटल स्वरूपात सुरक्षित साठवले जातात.

अधिकृत पासपोर्ट वेबसाइटवर जाऊन नवीन नोंदणी किंवा लॉगिन करून आवश्यक माहिती भरल्यानंतर पासपोर्ट सेवा केंद्राची अपॉइंटमेंट घ्यावी लागते.

ई-पासपोर्टसाठी ओळखपत्र आधार कार्ड/पॅन कार्ड, पत्त्याचा पुरावा आणि जन्मतारखेचा दाखला यांसारखी कागदपत्रे लागतात.

ई-पासपोर्टचे शुल्क पूर्वीप्रमाणेच असून ३६ पानांसाठी १,५०० रुपये आणि ६० पानांच्या पुस्तकासाठी २,००० रुपये शुल्क आकारले जाते.






