फोटो सौजन्य सोशल मिडिया
17 Year Old Student Death : पुणे जिल्ह्यातील राजगुरुनगर येथील भीमाशंकर रस्त्यावर एक अंगावर काटा आणणारा भीषण अपघात घडला असून, यामध्ये एका 17 वर्षीय विद्यार्थ्याचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ही संपूर्ण दुर्घटना परिसरातील एका सीसीटीव्ही (CCTV) कॅमेऱ्यात कैद झाली आहे.
मृत विद्यार्थ्याचे नाव वेदांत सहाणे (वय 17 वर्षे) असे अपघातात जीव गमावलेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. वेदांत हा विद्यार्थी रस्त्यावरून दुचाकी घेऊन जात असताना, समोरून येणारी इनोव्हा कार पाहून त्याने अचानक जोरात ब्रेक लगावला, समोरच्या गाडीचा वेग जास्त असल्याने ब्रेक लगावताच दुचाकीवरून वेदांतचे नियंत्रण सुटले आणि स्कूटर पुढे घसरली. दुचाकी घसरल्यामुळे वेदांत रस्त्यावर खाली पडला आणि समोरून येणाऱ्या इनोव्हा कारच्या चाकाखाली आला; यामध्ये त्याचा जागीच मृत्यू झाला.
हा भीषण अपघात सीसीटीव्ही कॅमेऱ्यात स्पष्टपणे रेकॉर्ड झाला असून हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून, अल्पवयीन मुलांना वाहने देण्याबाबत आणि रस्ते सुरक्षेबाबत पुन्हा एकदा गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार एक मोटारसायकल चालवत असताना वेदांत नावाच्या मुलाचे दुचाकीवरील नियंत्रण सुटले आणि तो पुढे जाणाऱ्या एका वाहनावर जाऊन जोरात आदळला, ही धडक इतकी जोरदार होती की, त्या मुलाचा जागीच मृत्यू झाला.
A split second mistake on the road turned fatal.
A 17-year-old student lost his life in a horrific motorcycle crash on Bhimashankar Road in Rajgurunagar, Pune district. CCTV footage captured the moment the rider lost control and slammed into a vehicle ahead. One life lost, a family left devastated. Speeding can have irreversible consequences. Please ride responsibly and never take road safety lightly. https://t.co/vQDlShZuv8 — Sachin Unfiltered (@TheSachinView) October 29, 2026
सीसीटीव्ही फुटेजमध्ये मोटारसायकल दुसऱ्या वाहनाच्या दिशेने जाताना आणि त्यानंतर अपघात घडताना दिसत आहे. या घटनेमुळे रस्त्यावरील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. गर्दीच्या ठिकाणी रस्त्यांवर दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने ही दुर्देवी घटना घडली. या घटनेमुळे रोज निर्माण होणाऱ्या धोक्यांबाबत चिंता व्यक्त केली जात आहे.
अल्पवयीन मुलांनी मोटारसायकल चालवण्यास देऊ नये; मुलांकडे गाडीचा परवाना असेल तरच त्याला गाडी चालवायला द्या; मुलांना वेगमर्यादेचे पालन करायला शिकवा आणि गाडीचे नियंत्रण सांभाळायला सांगा. हेल्मेटचा वापर करा.
टीप : या घटनेशी संबंधित माहिती सोशल मीडियावर शेअर करण्यात आलेल्या पोस्ट आणि व्हिडीओवर आधारित आहे. त्यातील सर्व दाव्यांची स्वतंत्रपणे पडताळणी झालेली असल्याचे निश्चितपणे सांगता येत नाही.
Ans: पुणे जिल्ह्यातील राजगुरुनगर येथील भीमाशंकर रस्त्यावर हा अपघात झाला.
Ans: वेदांत सहाणे (वय 17 वर्षे) या विद्यार्थ्याचे नाव आहे.
Ans: समोरून येणारी इनोव्हा कार पाहून वेदांतने अचानक ब्रेक लावला. त्यामुळे स्कूटर घसरून तो कारच्या चाकाखाली आला.






