दैनंदिन आहारात नियमित करा एक चमचा Apple Cider Vinegar चे सेवन
वाढलेले वजन कमी करण्यासाठी कोणत्याही प्रोटीनशेकचे सेवन करण्याऐवजी तुम्ही कोमट पाण्यात अॅपल सायडर व्हिनेगर मिक्स करून पिऊ शकता. यामुळे शरीरावर वाढलेली अनावश्यक चरबी वितळून जाईल.
अॅसिडिटी, बद्धकोष्ठता किंवा गॅसची समस्या वारंवार उद्भवू लागल्यास कोमट पाण्यात अॅपल सायडर व्हिनेगर टाकून प्यावे. यामुळे पचनसंस्था सुधारते आणि आरोग्याला अनेक फायदे होतात.
मधुमेहाच्या रुग्णांसाठी अॅपल सायडर व्हिनेगर वरदान ठरेल. कारण सकाळी उठल्यानंतर अॅपल सायडर व्हिनेगरचे पाणी प्यायल्यामुळे रक्तातील साखर नियंत्रणात राहील आणि आरोग्य सुधारेल.
शरीरात साचून राहिलेले विषारी घटक बाहेर काढून टाकण्यासाठी अॅपल सायडर व्हिनेगरचे पाणी प्यावे. या पाण्याचे सेवन केल्यास आतड्यांमध्ये साचून राहिलेली घाण स्वच्छ होईल.
शरीरात वाढलेले कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवण्यासाठी कोमट पाण्यात अॅपल सायडर व्हिनेगर टाकून प्यावे. यामुळे शरीराला अनेक फायदे होतील. कोलेस्ट्रॉल वाढल्यानंतर शरीरात अनेक बदल होऊ लागतात.