पावसाळ्यात शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी 'या' पदार्थांचा करा आहारात समावेश
तुळस ही एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे, पावसाळ्याच्या दिवसांमध्ये डासांपासून वाचण्यासाठी नियमित तुळशीचे एक पान तरी चावून खावे. यामुळे शरीरातील सर्वच विषारी घटक बाहेर पडून जातात.
आरोग्यासाठी आलं अतिशय प्रभावी आहे. आल्यामध्ये असलेले दाहक विरोधी गुणधर्म शरीराची कमी झालेली रोगप्रतिकारशक्ती सुधारण्यास मदत करतात. त्यामुळे तुम्ही आल्याचा चहा किंवा आल्याचे रसाचे सेवन करू शकता.
पावसाळा ऋतूला सुरुवात झाल्यानंतर सगळ्यांच्या घरी सूप किंवा गरम पेय बनवून खाल्ली जातात. याशिवाय तुम्ही मसाल्याचा चहा किंवा हर्बल टी चे सेवन करू शकता.
काळी मिरीमध्ये उष्णतेचा प्रभाव जास्त असतो. याशिवाय यामध्ये पाइपरिन नावाचे तत्व आढळून येते, ज्यामुळे शरीराची कमी झालेली रोगप्रतिकारशक्ती सुधारण्यास मदत होते.
पावसाळ्यात आहारात हंगामी फळे आणि भाज्यांचा समावेश करावा . हे रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याचे काम करतात. या भाज्यांमधील गुणकारी घटक शरीरासाठी अतिशय आवश्यक आहेत.