वाढलेले वजन होईल महिनाभरात कमी! सकाळच्या नाश्त्यात नियमित करा 'या' पौष्टिक पदार्थांचे सेवन
वजन वाढल्यानंतर आहारात कायमच सहज पचन होणाऱ्या आणि हलक्या पदार्थांचे सेवन करावे. त्यात सगळ्यांच्या आवडीचा पदार्थ म्हणजे बेसन चिल्ला. बेसन, कांदा आणि मिक्स भाज्यांचा वापर करून बनवलेला पदार्थ चवीला अतिशय सुंदर लागतो.
अनेक घरांमध्ये कायमच सकाळच्या नाश्त्यात ओट्स बनवले जातात. वेगवेगळे फळे, दूध आणि ओट्स इत्यादी तुमच्या आवडीचे पदार्थ टाकून खाऊ शकता. नाश्त्यात कायमच फायबर असलेले पदार्थ खावेत.
वेगवेगळ्या डाळी, तांदूळ आणि भाज्यांचा वापर करून बनवलेला डोसा चवीसोबतच आरोग्यासाठी सुद्धा खूप जास्त पौष्टीक आहे. सकाळी किंवा संध्याकाळच्या नाश्त्यात डोसा खाल्ल्यास इतर कोणतेही पदार्थ खाण्याची आवश्यकता भासणार नाही.
वजन कमी करण्यासाठी अत्यंत प्रभावी पदार्थ म्हणे वेगवेगळ्या पदार्थांपासून बनवलेली स्मूदी. सुका मेवा खाल्ल्यामुळे पोट जास्त वेळ भरलेले राहते आणि पोटावरील चरबी वितळून जाण्यास मदत होते.
सकाळच्या नाश्त्यात, आहारात नाचणीपासून बनवलेल्या पदार्थांचे सेवन केल्यास शरीराला प्रोटीन मिळेल. वजन कमी करताना कमी कॅलरीज असलेल्या पदार्थांचे सेवन करावे.