Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 21 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • India vs Afghanistan |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पोटावर फुग्यासारखी लटकलेली चरबी कमी करण्यासाठी नियमित करा ‘या’ पदार्थांचे सेवन,डॉक्टर सेठींनी सांगितला सोपा उपाय

पोटावर वाढलेला चरबीचा थर कमी करण्यासाठी आहारात वेगवेगळ्या कमी कॅलरीज असलेल्या पदार्थांचे सेवन करावे. यामुळे वजन कमी होण्यास मदत होईल आणि महिनाभरात स्लिम दिसाल.

  • By सुरुची कदम
Updated On: Jan 23, 2026 | 05:30 AM
पोटावर फुग्यासारखी लटकलेली चरबी कमी करण्यासाठी नियमित करा 'या' पदार्थांचे सेवन

पोटावर फुग्यासारखी लटकलेली चरबी कमी करण्यासाठी नियमित करा 'या' पदार्थांचे सेवन

Follow Us
Follow Us:

वजन कमी करण्यासाठी उपाय?
पोटावरील चरबी कमी करण्यासाठी काय खावे?
लठ्ठपणा वाढण्याची कारणे?

जगभरात लठ्ठपणामुळे अनेक लोक त्रस्त आहेत. लठ्ठपणा वाढल्यानंतर आरोग्यासंबंधित बऱ्याच समस्या उद्भवतात. मधुमेह, उच्च कोलेस्ट्रॉल, पोटावर चरबीचा थर वाढणे, उच्च रक्तदाब इत्यादी अनेक गंभीर आजारांची शरीराला लागण होते. धावपळीच्या जीवनशैलीचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो. सतत काम, जंक फूडचे अतिसेवन, तिखट तेलकट पदार्थ, अपुरी झोप आणि वारंवार बिघडलेली पचनक्रिया आजारांचे मुख्य कारण आहे. पोटावर वाढलेले फॅट कमी करण्यासाठी चयापचय क्रियेत अनेक अडथळे निर्माण होतात. ज्यावेळी शरीरात ‘इन्सुलिन रेसिस्टन्स’ वाढते तेव्हा टाईप २ मधुमेह होण्याची शक्यता असते. अशावेळी आहारात बदल करणे आवश्यक आहे. शरीरात वाढलेली चरबी कमी करण्यासाठी बऱ्याचदा महागडा डाएट सुद्धा घेतला जातो. पण याचा फारसा परिणाम शरीरावर दिसून येतो. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला पोटावर वाढलेला चरबीचा घेर कमी करण्यासाठी आहारात कोणत्या पदार्थांचा समावेश करावा, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत.(फोटो सौजन्य – istock)

स्टेरॉइड्सच्या अतिवापरामुळे वाढतो दुय्यम काचबिंदूचा धोका, जाणून घ्या तज्ज्ञांनी दिलेली सविस्तर माहिती

ग्रीन टी:

सकाळी उठल्यानंतर दुधाचा चहा किंवा कॉफीचे सेवन करण्याऐवजी ग्रीन टी प्यावी. उपाशी पोटी ग्रीन टी प्यायल्यास शरीरावर वाढलेला अनावश्यक चरबीचा थर कमी होईल. ग्रीन टी मध्ये असलेले अँटीऑक्सिडंट्स केवळ वजन कमी न करता रक्तातील साखरेचे प्रमाण सुद्धा नियंत्रणात ठेवतात. त्यामुळे नियमित सकाळ संध्याकाळ ग्रीन टी चे सेवन करावे. याशिवाय ग्रीन टी मध्ये लिंबू मिक्स करून प्यावा.

पालेभाज्या:

हिरव्या पालेभाज्यांचे सेवन करणे शरीरासाठी अतिशय फायदेशीर ठरते. नियमित एक हिरवी पालेभाजी खावी. पालक, मेथी, मुळा इत्यादी भाज्यांमध्ये असलेले फायबर आतड्यांमध्ये जमा झालेली घाण बाहेर काढून टाकतात आणि शरीर स्वच्छ करतात. हिरव्या पालेभाज्यांमध्ये फायबर, सूक्ष्म पोषक घटक आणि अँटीऑक्सिडंट्स मुबलक प्रमाणातबी आढळून येतात, ज्यामुळे शरीराच्या आतील अवयवांना आलेली सूज कमी होते. वजन कमी करताना कमी कॅलरीज असलेल्या पदार्थांचे सेवन करावे. रक्तातील साखर नियंत्रणात राहिल्यास सतत भूक लागणार नाही.

ब्लूबेरीज:

पोटाभोवती वाढलेला चरबीचा घेर कमी करण्यासाठी ब्लूबेरीज खावे. यामध्ये असलेले अँथोसायनिन नावाचे शक्तिशाली अँटीऑक्सिडंट शरीरातील दाह कमी करतो. नियमित वाटीभर कोणत्याही बेरीज खाल्ल्यास महिनाभरात वजन कमी होण्यासोबतच चेहऱ्यावर सुद्धा चमकदार ग्लो येईल आणि तुम्ही सुंदर दिसाल. नियमित बेरीज खाल्ल्यामुळे इन्सुलिन संवेदनशीलता सुधारण्यास मदत होते.

सकाळी जोर लावून सुद्धा पोट व्यवस्थित स्वच्छ होत नाही? मग रात्री झोपण्याआधी करा ‘या’ बारीक दाण्यांचे सेवन, घाण पडून जाईल बाहेर

फॅटी फिश:

जेवणात फॅटी फिशचा समावेश करावा. माशांमध्ये असलेले प्रोटीन शरीराला भरपूर ऊर्जा देते. सॅल्मन, सार्डिन आणि मॅकरेल यांसारख्या फॅटी फिशमध्ये भरपूर प्रमाणात ओमेगा-३ फॅटी ॲसिड्स असते. यामुळे शरीराच्या आतील अवयवाला आलेली सूज कमी होण्यास मदत होते. रक्तातील ट्रायग्लिसराइड्सची पातळी संतुलित ठेवण्यासाठी माशांचे सेवन करण्याचा सल्ला दिला जातो.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Web Title: To reduce the belly fat that hangs like a balloon consume these foods regularly dr sethi has suggested a simple solution

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 23, 2026 | 05:30 AM

Topics:  

  • lose weight
  • weight loss remedies
  • weight loss tips

संबंधित बातम्या

Health Tips: भात की चपाती? वजन वाढण्यामागचं ‘ते’ खरं कारण जाणून घ्या
1

Health Tips: भात की चपाती? वजन वाढण्यामागचं ‘ते’ खरं कारण जाणून घ्या

Weight Loss Tips फिटनेसचा नवा ट्रेंड; ब्लॅक कॉफी अन् तूप, वजन कमी करण्यासाठी किती फायदेशीर?
2

Weight Loss Tips फिटनेसचा नवा ट्रेंड; ब्लॅक कॉफी अन् तूप, वजन कमी करण्यासाठी किती फायदेशीर?

पोट- मांड्यांवर वाढलेला चरबीचा थर झपाट्याने होईल कमी! उपाशी पोटी नियमित करा ‘या’ पेयांचे सेवन, राहाल कायमच निरोगी
3

पोट- मांड्यांवर वाढलेला चरबीचा थर झपाट्याने होईल कमी! उपाशी पोटी नियमित करा ‘या’ पेयांचे सेवन, राहाल कायमच निरोगी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.