रुपयाची खरी ताकद 'या' देशांमध्ये दिसते; 100 रुपये खर्च करण्यातच संपूर्ण दिवस निघून जाईल
इंडोनेशिया हे भारतीय पर्यटकांमध्ये खूप लोकप्रिय ठिकाण आहे, जिथे सुंदर मंदिरे, समुद्रकिनारे आणि आश्चर्यकारक वन्यजीव पाहता येतात. येथे 1 भारतीय रुपयाची किंमत 191.433 इंडोनेशियन रुपिया (IDR) इतके आहे. इथे भारताचे 100 रुपये 19 हजारांपेक्षा जास्त होतील
तुम्हाला सुंदर दृश्ये, रोमांचक साहस आणि स्वादिष्ट भोजन आवडत असल्यास, व्हिएतनाम हे तुमच्यासाठी योग्य ठिकाण आहे. येथे तुम्ही ट्रेकिंग आणि सायकलिंगसारख्या ॲक्टिव्हिटीजचा आनंद घेऊ शकता. 1 भारतीय रुपयाचे मूल्य 295.6944 व्हिएतनामी डोंग इतके आहे
कंबोडिया ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारशासाठी प्रसिद्ध आहे. येथील अंगकोर वाट मंदिर जगभरातील पर्यटकांना आकर्षित करते. येथे 1 भारतीय रुपयाची किंमत मूल्य 49.798883 कंबोडियन रिएल इतके आहे. येथे तुम्ही शाही राजवाडा, राष्ट्रीय संग्रहालय आणि अनेक पुरातत्व अवशेषांना भेट देऊ शकता
दक्षिण अमेरिकेत असलेला पॅराग्वे हा भारतीय चलनाच्या बाबतीतही स्वस्त आणि सुंदर देश आहे. येथील इग्वाझू फॉल्स आणि जगातील सर्वात मोठे जलविद्युत धरण पाहण्यासारखे आहे. येथे 1 भारतीय रुपयाची किंमत 89.315412 पॅराग्वे ग्वारानी इतके आहे
जर तुम्हीही युरोपला जाण्याचे स्वप्न पाहत असाल तर हंगेरी हा एक उत्तम पर्याय ठरू शकतो. हा देश त्याच्या भव्य इमारती, रोमन आणि तुर्की वास्तुकला, थर्मल स्पा आणि जागतिक वारसा स्थळांसाठी ओळखला जातो. येथे 1 भारतीय रुपयाची किंमत 4.391055 हंगेरियन फॉरिंट इतके आहे